Join us

क्रिती सॅननच्या आयुष्यात आला हा खास सदस्य, सोशल मीडियाद्वारे तिनेच दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 1:11 PM

क्रितीच्या आयुष्यात आता खास सदस्याचे आगमन झाले आहे.

ठळक मुद्देहा सदस्य दुसरा कोणीही नसून एक क्यूट कुत्रा आहे. क्रितीनेच सोशल मीडियाद्वारे ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन आजघडीला इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. तिने प्रचंड स्ट्रग्ल करून आज बॉलिवू़डमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले आहे. 

क्रितीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. क्रितीच्या आयुष्यात आता खास सदस्याचे आगमन झाले आहे. हा सदस्य दुसरा कोणीही नसून एक क्यूट कुत्रा आहे. क्रितीनेच सोशल मीडियाद्वारे ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिने या क्यूट कुत्र्यासोबत तिचा आणि तिची बहीण नुपूरचा फोटो शेअर करत त्यांच्या कुटुंबातील या नवीन सदस्याविषयी सगळ्यांना सांगितले आहे. क्रितीच्या कुटुंबात याआधी डिस्को नावाचा कुत्रा आहे. आता आणखी एका सदस्याचे त्यांच्या कुटुंबाचे आगमन झाले असून या सदस्याच्या आगमनामुळे घरातील सगळेच खूश आहेत. 

क्रितीच्या आयुष्यातील हा नवीन सदस्य खूपच क्यूट असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

क्रिती 'लुका छिपी', 'कलंक' आणि 'अर्जुन पटियाला' यांसारख्या सिनेमात झळकली होती. यावर्षी तिचे 'हाउसफुल 4' आणि 'पानिपत' असे दोन चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये क्रितीची गणना केली जाते. ती खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरुणी तिला फॉलो करतात. क्रिती फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी स्ट्रीक्ट डाएटसोबत स्ट्रीक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते. कृती सुंदर असण्यासोबतच हेल्दी आणि फिटही आहे. फिगर स्लिम आणि फिट ठेवण्यासाठी तिच्या दिवसाची सुरुवात ती व्यायामाने करते. क्रितीच्या वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, रनिंग यांचा समावेश आहे. डान्स केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो असे ती सांगते. ती दिवसातून तीनदा तरी वर्कआऊट करते.

टॅग्स :क्रिती सनॉन