कमाल रशिद खान उर्फ केआरकेला या कारणामुळे करण्यात आले रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:00 PM2018-10-22T18:00:53+5:302018-10-22T18:02:03+5:30
केआरके गेल्या अनेक महिन्यांपासून दुबईत असल्याचे म्हटले जाते. त्याच्या केआरकेबॉक्सऑफिस या ट्विटर हँडलवरून त्याच्याविषयी एक नुकतीच बातमी देण्यात आलेली आहे.
कमाल रशिद खान उर्फ केआरके नेहमीच वादात असतो. त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो काही रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकला आहे. त्याने काही चित्रपटांची निर्मिती देखील केली असून तो एक व्यवसायिक देखील आहे. त्याचा गारमेंटचा व्यवसाय असून त्याचा टर्नओव्हर एक हजार कोटी इतका असल्याचे म्हटले जाते. केआरके त्याच्या वादग्रस्त ट्वीटसाठी ओळखला जातो. त्याने त्याच्या ट्वीटमुळे बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत पंगे घेतले आहेत.
काही महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये केआरकेने त्याला कॅन्सर असल्याचे सगळ्यांना सांगितले होते. त्याला पोटाचा कॅन्सर असून तो फक्त एक-दोन वर्षंच जगू शकतो असे त्यानेच ट्वीट करून सगळ्यांना कळवले होते. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, मला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असून माझ्याजवळ आता एक-दोन वर्षंच उरली आहेत. त्यामुळे मी आता कुणालाही एन्टरटेन करणार नाही. तसेच मला कुणाचीही सहानभूती नकोय... जे लोक मला अजूनही शिव्या देतात, माझा तिरस्कार करतात त्यांच्यावर देखील मी प्रेम करतो. या ट्वीटनंतर केआरके मीडियापासून दूरच होता.
केआरके गेल्या अनेक महिन्यांपासून दुबईत असल्याचे म्हटले जाते. त्याच्या केआरकेबॉक्सऑफिस या ट्विटर हँडलवरून त्याच्याविषयी एक नुकतीच बातमी देण्यात आलेली आहे. दुबईतील घरात केआरके पडला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्याला तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्याच्या स्टाफने त्याच्याविषयी हे ट्वीट केले असल्याचे म्हटले जात आहे. या ट्वीटमध्ये सांगण्यात आलेले आहे की, दुःखद बातमी... केआरके आपल्या दुबई घरात पडले असून त्यांना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सध्या ते बेशुद्ध असून लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी ही विनंती.
केआरके त्याच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे रिव्ह्यू पोस्ट करत असतो. त्याने नुकताच अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या नमस्ते लंडन या चित्रपटाचा रिव्ह्यू त्याच्या ट्विटवर हँडलवरून पोस्ट केला होता.
Sad news! KRK collapsed last night at his Dubai home and admitted to Dubai hospital where he is unconscious! Please pray for him. pic.twitter.com/WxnKSEzufW
— KRKBOXOFFICE (@KRKBoxOffice) October 19, 2018