नवी दिल्ली - अभिनेता आणि समीक्षक कमल राशिद खान (kamaal rashid khan) सोशल मिडियावर नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून केआरके (KRK) बॉलीवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सिंगर मीका सिंह (Mika Singh) यांच्या सोबतच्या वादांमुळे चर्चेत आहे. यातच त्याने नुकतेच पंतप्रधाननरेंद्र मोदींसंदर्भातही (PM Narendra Modi) एक ट्विट केले आहे. (krk kamaal rashid khan tweeted PM Narendra Modi will be clean bold out in 2024)
केआरकेचे ट्विट -केआरकेने पीएम मोदी आणि 2024 ला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात ट्विट केले आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की 'माझा आजचा अंदाज - पीएम मोदी जी 2024 मध्ये क्लीन बोल्ड आउट होतील' केआरकेचे हे ट्विट सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे आणि सोशल मिडिया यूझर्स यावर प्रतिक्रियादेखील देऊ लागले आहेत.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचं शेतकऱ्यांना खास गिफ्ट? होणार मोठा फायदा!
अशा आहेत सोशल मिडिया यूझर्सच्या रिअॅक्शन्स -केआरकेच्या या ट्विटवर सोशल मिडिया यूझर्स वेगवेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट होताना दिसत आहेत. काही युझर्स त्याच्या म्हणण्यावर सहमती दर्शवत आहेत, तर काही युझर्स त्याला ट्रोलदेखील करत आहेत.
"ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? पुलवामानंतर जसं..."; जम्मूतील ड्रोन हल्ल्यावर ओवेसींची प्रतिक्रिया
"संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल"
वाद आणि केआरके -केआरके गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि मीका यांच्या सोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. केआरकेने दावा केला आहे, की सलमान खानने 'राधे' चित्रपटाच्या निगेटिव्ह रिव्यूसाठी त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सलमान खानच्या लीगल टीमने म्हटले आहे, की केआरके मानहानीच्या गुन्ह्यासंदर्भात जे कारण सांगत आहे, ते चुकीचे आहे. मुळात केआरकेने सलमानला बदनाम करण्यासाठी विविध प्रकारचे आरोप केले आहेत, तो भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे आणि त्याची संस्था बीइंग ह्यूमनवर फसवणुकीचा आणि पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. म्हणून त्याच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय मीकानेही केआरकेवर एक गाणे तयार केले आहे. तसेच केआरके यापूर्वीही अनेक ट्विट्समुळे वादात अडकला आहे.