Join us

'हा चित्रपट नक्कीच हिट होईल'; चित्रपटांवर कायम टीका करणाऱ्या KRK ने केला 'राधे श्याम'वर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:02 AM

Radhe shyam: कलाविश्वातील कोणत्याही बड्या स्टारचा चित्रपट प्रदर्शित झाला की केआरके त्यावर त्याची प्रतिक्रिया देत असतो.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर साऊथ स्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या राधे श्याम या चित्रपटाची चर्चा होती. अखेर हा चित्रपट आज (११ मार्च) प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यामध्येच आता स्वयंघोषित चित्रपट समिक्षक केआरके याने त्याचं मत नोंदवलं आहे.

कलाविश्वातील कोणत्याही बड्या स्टारचा चित्रपट प्रदर्शित झाला की केआरके त्यावर त्याची प्रतिक्रिया देत असतो. यावेळीदेखील राधे श्याम प्रदर्शित झाल्यावर त्याने ट्विटवर त्याच मत नोंदवलं आहे. विशेष म्हणजे दरवेळी कलाकार, दिग्दर्शकांवर टीका करणाऱ्या केआरकेने यावेळी मात्र 'राधे श्याम'चं कौतुक केलं आहे.

Radhe Shyam Review: नशीब अन् प्रेमातलं अनोखं युद्ध 'राधे श्याम';  लव स्टोरीचा नवा पॅटर्न

काय म्हणाला केआरके?

"राधे श्यामचा फर्स्ट हाफ चांगला आहे. दिग्दर्शकांनी उत्तम पद्धतीने काम केलं आहे. तसंच पूजा हेगडे आणि प्रभासनेदेखील छान काम केलं आहे. आशा आहे, चित्रपटाचा सेकंड हाफदेखील चांगला असेल," असं ट्विट केआरकेने केलं आहे.

पुढे त्याने आणखी एक ट्विट केलं आहे. त्यानुसार, "चित्रपटाचा सेकंड हाफ फारसा छान नाही. पण, तरीदेखील राधे श्याम हा चित्रपट एकंदरीत चांगला आहे. हा चित्रपट नक्कीच हिट होईल. या चित्रपटाचं सगळं श्रेय दिग्दर्शकांना जातं."

दरम्यान, राधे श्याम या चित्रपटाचं दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून चर्चेत होता. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५-६ कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीप्रभाससिनेमा