इंटरनेटच्या जगात काय व्हायरल होईल आणि कोणती गोष्ट ट्रोलिंगचे कारण बनेल, हे सांगता यायचे नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टल डिसुझा हिचेच उदाहरण घ्या. अलीकडे क्रिस्टलने क्रिकेट जगताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्यासोबत पार्टी केली. या पार्टीचा फोटो क्रिस्टलने शेअर केला. सोबत एक कॅप्शनही लिहिले. मग काय, क्रिस्टल ट्रोल झाली.
क्रिस्टल तू पहिल्यांदाच हार्दिकला भाऊ म्हणून मोकळी झालीस, हे चांगले केलेस, , असे एका युजरने लिहिले. तर अन्य एका युजरने, ‘चहात जशी चहा पावडर घालण गरजेचे असते तेवढेच हार्दिकला भाऊ म्हणणे गरजेचे आहे’, असे लिहित क्रिस्टलला ट्रोल केले. एका युजरने थेट हार्दिकवर वर्णभेदी टीका केली. ‘तू वेस्ट इंडिजला का नाही जात,’असे या युजरने लिहिले. युजरची ही वर्णद्वेषी प्रतिक्रिया पाहून अभिनेता अपारशक्ति खुराणाला राहावले नाही आणि तो हार्दिक आणि क्रिस्टलच्या मदतीला धावून आला. हार्दिक एक चांगला खेळाडू आहे. निदान वर्डकपच्या आधी त्याच्याबाबत अशाप्रकारच्या गोष्टी आपण बोलायला नको, असे अपारशक्तीने या युजरला सुनावले. यावर क्रिस्टलनेही आपली प्रतिक्रिया दिली. खूप छान अपारशक्ती, लोक स्क्रिनच्या मागे राहून वाट्टेल ते लिहितात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणेच उत्तम, असे क्रिस्टलने लिहिले. हार्दिक सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असून वर्ल्डकप २०१९ साठी त्याची भारतीय संघांत निवड झाली आहे.