Join us

अमिताभ बच्चन यांचा जावई आहे बॉलिवूडचा हा अभिनेता, गुपचूप बांधली होती लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 7:00 AM

कोण आहे हा अभिनेता? कसा पडला बच्चन घराण्याच्या लेकीच्या प्रेमात?

ठळक मुद्देकुणाल कपूरला आज लोक अभिनेता म्हणून ओळखतात. पण तो पायलटही आहे. लहानपणापासूनच त्याचे आकाशात उडण्याचे स्वप्न होते.

अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor)पहिल्यांदा तब्बूचा हिरो म्हणून पडद्यावर झळकला होता. चित्रपटाचे नाव होते, ‘मीनाक्षी- अ टेल ऑफ  थ्री सिटीज’. पण कुणालला खरी ओळख दिली ती ‘रंग दे बसंती’ या सिनेमाने. यानंतर लागा चुनरी में दाग, डिअर जिंदगी, आजा नचले अशा अनेक हिट सिनेमांत तो दिसला. या कुणाल कपूरबद्दल आणखी एक गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक असावी. होय, कुणाल हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जावई आहे. खुद्द कुणालने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता, तेव्हा कुठे याबद्दल सर्वांना कळले होते.

अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी नैनासोबत त्याचे लग्न झालेय. नैनाला बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. तिचे प्रयत्न सुरू असतानाच कुणालसोबत तिची मैत्री झाली आणि पुढे ही मैत्री प्रेमात बदलली. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर कुणाल व नैना विवाहबंधनात अडकले होते. या लग्नाला अमिताभ कुटुंबासह हजर होते.

 

2015 साली कुणाल व नैनाचे लग्न झाले होते. पण तेव्हा या लग्नाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक होते. कारण कुणालला आपल्या लग्नाचा गवगवा नको होता. कुणालला फॉर्मुला रेसिंगचीही आवड आहे. याच्या ट्रेनिंगसाठी तो खास अबू धाबीला गेला होता. येथे त्याने फॉर्मुला 3 चे प्रशिक्षण घेतले होते.  

कुणाल कपूरला आज लोक अभिनेता म्हणून ओळखतात. पण तो पायलटही आहे. लहानपणापासूनच त्याचे आकाशात उडण्याचे स्वप्न होते. 2010-11 मध्ये तो एका फ्लाइंग क्लबचा सदस्य बनला व नंतर त्याने पायलट लायसन्सही मिळवले.त्याची आणखी एक आवड म्हणजे लिखाण. होय, म्हणजेच कुणाल लेखकही आहे. ‘लव शव ते चिकन खुराना’ या सिनेमाचा तो को-राइटर होता. याशिवाय एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी त्याने दीर्घकाळ एक कॉलम चालवला.  

टॅग्स :अमिताभ बच्चनकुणाल कपूर