दांडिया आणि गरब्याची बात न्यारी... आणि हाच गरबासाठी सेलिब्रेटी मंडळीही आतुरतेने वाट पाहात असतात. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांवर आलेला नवरात्रौत्सवासाठी बॉलिवूड अभिनेता कुणार कपूर सज्ज झाला आहे. यंदा तो सा-यांनाच एक खास सरप्राईजही देणार आहे. गरबाप्रेम आता लपून राहिलेलं नाही.
अमित साटमच्या नॅशनल डेकोरेटर्सच्या सहकार्याने जुहू येथे 'आदर्श नवरात्री उत्सव' या सर्वात मोठ्या नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा आदर्श नवरात्री उत्सव १० ते १८ ऑक्टोबर रोजी ऋतुंबारा कॉलेज जवळील जेव्हीपीडी ग्राऊंड मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या नवरात्री उत्सवाद्वारे एक सामाजिक-सांस्कृतिक पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबद्दल सांगताना अमित साटम म्हणतात की, "या पुढाकाराने आम्ही कुणाल कपूर यांच्याशी करार करून त्यांच्या 'केटो' या जन-सहयोग प्लॅटफॉर्मद्वारे गरजूंना निधी उपलब्ध करून देणार आहोत. तसेच त्यांच्या या संकल्पनेचा प्रचार करून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा निर्धार आहे." नवरात्र हा खर्चिक नसलेला म्युझिकल हायलाइटशिवाय आश्चर्यकारक उत्पादन मूल्यांचा दावा करणारा दांडियाचा राजा दीपक कुमार यांच्या उत्साहवर्धक संगीतावर आधारलेला कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
कुणाल कपूर सांगितले की, "अमित बरोबर काम करणे नेहमीच आनंददायी असते तो केवळ एक मित्रच नाही तर सामाजिक प्रासंगिकतेच्या कोणत्याही गोष्टीचे समर्थन करण्यास नेहमीच पुढाकार घेणारं एक चैतन्यशील व्यक्तिमत्त्व आहे. जेव्हा आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज असते तेव्हा तो स्वयं आमच्या मदतीसाठी दरवेळी हजर असतो. आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर आहे त्यापेक्षा अधिक सुंदर बनविण्यास त्याने लावलेला हातभार आणि त्याने आजवर केलेल्या सर्व कामांबद्दल मी त्याचे आभार मानतो." 'से नो टू प्लॅस्टिक' या उपक्रमास महत्त्व देण्यासाठी, नवरात्रीच्या उत्पन्नाचा वापर इको-फ्रेंडली कापडी पिशव्या बनविण्यासाठी करण्यात येणार आहे.
कुणाल कपूर हा फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला असून, त्यात तो आपले मसल्स दाखविताना दिसतो आहे.काही दिवसांपूर्वी कुणालने चंदू चेकवार याच्या वीरममध्ये कलरीपट्टूची भूमिका निभावली होती. आता त्याच्या शरीरात खूप बदल झाला आहे. त्याने पूर्वीचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या शरीरात झालेला कमालीचा बदल झालेला पाहायला मिळतो आहे .