Join us

सासरी गेल्यावर खाणं-पिणंही मुश्कील करते करिना ..., कुणाल खेमू असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 2:56 PM

Kunal Khemu on Kareena Kapoor: कुणाल सासरी गेल्यावर अगदी जावयबापूला कुठे ठेऊ नि कुठे नको, असं सासरच्या मंडळींना होतं. जावई म्हणून त्याचा मोठा मानपान, आदर होतो. पण खरी समस्या येते ती डिनर टेबलवर.

Kunal Khemu on Kareena Kapoor:  बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) सैफ अली खानचा (Saif Ali Khan) जावई आहे. 2015 साली सैफची बहिण सोहा अलीसोबत (Soha Ali Khan)  कुणालनं लग्नगाठ बांधली. नवाब पतौडी घराण्याचा जावई झाल्यावर मग काय? सासरी बडदास्त होणारच.  कुणाल सासरी गेल्यावर अगदी जावयबापूला कुठे ठेऊ नि कुठे नको, असं सासरच्या मंडळींना होतं. जावई म्हणून त्याचा मोठा मानपान, आदर होतो. पण खरी समस्या येते ती डिनर टेबलवर. होय, कुणालने एका ताज्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं.सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कुणाल खेमूने सासरचा अनुभव शेअर केला.

करिना खाणं-पिणंही मुश्कील करते...होय, सासरी डिनर टेबलवर खाणं-पिणं मुश्कील होतं... असं कुणाल खेमू म्हणाला. त्याने सांगितलं, ‘ सोहासोबत मी तिच्या घरी म्हणजे माझ्या सासरी जातो त्यावेळी तिथे  जेवण करणं फारच कठीण होतं. माझ्या सासरी डिनर टेबल म्हणजे जणू एखाद्या कॉमेडी शोचा स्टेज असतो. विशेषत:  सैफ आणि करीना  आमच्यासोबत डिनरला हजर असले की धम्माल मस्ती, मस्करी चालते. करीना कपूर (Kareena Kapoor) अतिशय विनोदी व्यक्ती आहे. खरं तर पहिल्याच भेटीत मी ते ओळखून होतो. पण आता मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाल्यावर करिनाबद्दल मी हक्कानं आणखी सांगू शकतो.

ती विनोदी आहेच पण ती थोडी लाजरी देखील आहे. ती इतकी फनी आहे, इतके विनोद करते की आम्ही जेवायला बसलो असतो पण खाणं मुश्कील होतं.  डिनर टेबल एखाद्या लाफ्टर क्लबसारखं वाटतं. सासरची सगळी मंडळी सगळी अशीच आहेत. सगळे एकदम हलक्या फुलक्या मूडमध्ये असतात.’कुणालच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो ‘कंजूस मक्खीचूस’ व ‘मलंग 2’ या चित्रपटात दिसणार आहे.  

टॅग्स :कुणाल खेमूकरिना कपूरसैफ अली खान सोहा अली खान