Join us

एकीकडे घटस्फोट तर दुसरीकडे अर्जुनसोबत अफेअरच्या चर्चा; अखेर कुशा कपिलानं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 14:23 IST

लग्नाच्या सहा वर्षानंतर घटस्फोट आणि अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपवरील चर्चांवर कुशाने एका मुलाखतीत मौन सोडलं. 

कुशा कपिला ही एक नावाजलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कॉमेडियनही आहे. कुशाने अभिनयाकडं मोर्चा वळवला असून लवकरच शिल्पा शेट्टी स्टारर 'सुखी' आणि भूमी पेडणेकर स्टारर 'थँक यू फॉर कमिंग'मधून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. आता ती वैयक्तिक आयुष्यावरुन चर्चेत आलेली आहे.  लग्नाच्या सहा वर्षानंतर घटस्फोट आणि अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपवरील चर्चांवर कुशाने एका मुलाखतीत मौन सोडलं. 

 आता नुकत्याच झूम एंटरटेन्मेंट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कुशा म्हणाली, "ट्रोलिंग हे पब्लिक फिगर असल्याचा हा एक भाग आहे. त्यामुळे जर तुम्ही  पब्लिक फिगर आहात तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम कहना" हे कायम सुरुच राहणार आहे. त्यामुळे माझं पुर्ण लक्ष हे फक्त स्वतःला अधिकाधिक खंबीर करण्यावर आहे. ट्रोलिंगचा स्वतःवर काहीच परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते आणि स्वतःला समजवावं लागतं. पण शेवटी या जखमासुद्धा लवकरात लवकर भरून निघतीलच. 

कुशा कपिलाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करताच काही दिवसांमध्येच तिचं नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडलं जाऊ लागलं.  याबाबत कुशाला विचारले असता ती म्हणाली, "यावर उत्तर देऊन त्या चर्चांना आणखी खतपाणी द्यायचं नाहीये. खर तर मला याविषयी काही बोलण्याची गरजच वाटत नाही". 

कुशा जून 2023 मध्ये पती जोरावर अहलुवालियापासून विभक्त झाली आहे. लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. कुशाने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप कठीण असल्याचे तिने सांगितले होते.

 

अर्जुन कपूर आणि कुशा कपिला यापूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या घरी एकत्र दिसले होते, जिथे मलायका अरोरा त्याच्यासोबत दिसली नव्हती. पार्टीचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्रत्येकजण कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत होता. त्यानंतरच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. 

कुशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कुशा याआधी अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि रितेश देशमुखच्या 'प्लॅन ए प्लॅन बी' या सिनेमात झळकली आहे.  नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. इतकंच नव्हे तर करण जोहरच्या ‘घोस्ट स्टोरीज’ चित्रपटातही तिने छोटीशी भूमिका साकारली होती. शिवाय, काही कार्यक्रमही तिने होस्ट केले आहेत. आता तीचा अभिनय 'सुखी' आणि 'थँक्यू फॉर कमिंग'मध्ये पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासोशल मीडियाअर्जुन कपूर