Join us

कुशल छेड़ाच्या 'आजा बतला दू मै' गाण्याला मिळतेय चांगली दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:55 PM

२१ वर्षीय मुंबईकर कुशल छेड़ा याची गायक, गीतकार, संगीतकार, पियानोवादक, संगीत निर्माता, वक्ता अशी ओळख आहे.

२१ वर्षीय मुंबईकर कुशल छेड़ा याची गायक, गीतकार, संगीतकार, पियानोवादक, संगीत निर्माता, वक्ता अशी ओळख आहे. कुशलने लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये संगीतात 3 पदव्या मिळवल्या असून मुंबई विद्यापीठातून आर्किटेक्ट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अलौकिक,अद्वितीय गुणवत्ता असलेल्या कुशलने सातत्याने अदिति सिंह शर्मा, शर्ली सेतिया, अभिजीत सावंत, भुवन बम, अंतरा मित्रा, जोनिता गांधी, या मान्यवर बॉलीवुड कलाकारांसोबत काम केले आहे. युट्युबवरच्या त्याच्या कवर साँगने ३८ कोटी प्रेक्षक संख्या मिळवली आहे.

कुशल छेड़ाने आपले पहिले पदार्पणाचे गीत 'आजा बतला दू मैं' नुकतेच रिलीज केले,ज्याची संगीत क्षेत्रात खूप प्रशंसा होत आहे. हे गाणे ऐकता क्षणीच गुणगुणावे असे आहे. टंग ट्विस्टर पद्धतीचे हे कठीण गाणे कुशलने गायले आहे. संगीत आणि अभ्यास दोन्ही एकाच वेळी यशस्वीपणे सांभाळणे हे संगीत आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींवर प्रेम असल्याने शक्य असल्याचे कुशलने सांगितले.  

कुशलला स्टेजवरती '# कुशलमंगल' नावाने जास्त ओळखले जाते. जगणे म्हणजे आनंदी क्षणांचा कोलाज असून,हे क्षण आपल्या संगीतातून देण्याचा प्रयत्न करण्याचा ध्यास असल्याचे,कुशल सांगतो,तेव्हाच त्याच्या संगीताचे वेगेळेपण विशेषत्वाने लक्षात येते.