Join us  

Laal Singh Chaddha: अखेर 'लाल सिंग चड्ढा' Netflixवर येणार; अतिशय कमी किमतीत झाला करार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 4:38 PM

Laal Singh Chaddha: बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपयशी ठरल्यामुळे नेटफ्लिक्सने चित्रपटाकडे पाठ केली होती.

Laal Singh Chaddha:आमिर खानच्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहायचे, पण गेल्या काही वर्षात आमिरची जादू हरवली आहे. बिग बजेट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या अपयशानंतर आमिर 'लाल सिंग चड्ढा'तून कमबॅक करेल, अशी अपेक्षा होती. पण, हा चित्रपट मोठा डिझास्टर ठरला. यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनेही चित्रपटासोबतडी डील रद्द केल्याची बातमी समोर आली होती. पण, आता अखेर चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे.

आमिर खानच्यालाल सिंग चड्ढाला OTT खरेदीदार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 'नेटफ्लिक्स'ने चित्रपट विकत घेतल्याचे बोलले जात आहे. चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे अतिशय कमी पैशांमध्ये नेटफ्लिक्सने ही डील केली आहे. रिलीजपूर्वी नेटफ्लिक्स आमिरचा चित्रपट विकत घेण्यासाठी उत्सुक होते, मेकर्सनी नेटफ्लिक्ससमोर 150 कोटींची डील ठेवली होती. पण, चित्रपटाच्या अपयशामुळे ही डील रद्द झाली आणि अखेर 50 कोटींवर चित्रपट विकत घेण्यास नेटफ्लिक्सने होकार दिल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने लाल सिंग चड्ढाचा करार रद्द केल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म Voot सोबत 125 कोटींचा करार केल्याची माहिती होती. पण, नंतर नेटफ्लिक्सने निर्मात्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा केली. दोन्ही पक्षांनी या कराराच्या तोट्यांऐवजी फायदे पाहिले. आमिरला नेटफ्लिक्सकडून जागतिक स्तरावर पोहोचता येईल. दुसरीकडे, OTT वर आल्याने चित्रपटाच्या परदेशातील व्यवसायाला फायदा होईल.

8 आठवड्यांनंतर ओटीटीवर येणार कारण काहीही असो, चाहत्यांना आता चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट OTT वर पाहण्यासाठी त्यांना 6 महिने वाट पाहावी लागणार नाही. लाल सिंग चड्ढा रिलीजच्या तारखेपासून 8 आठवड्यांनंतर तुमच्या मोबाइल स्क्रीनवर दिसणार असल्याची चर्चा आहे. निर्मात्यांनी त्यांचे दरही कमी केले आहेत. मात्र, या कराराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :लाल सिंग चड्ढाआमिर खाननेटफ्लिक्स