Join us  

'ऑस्करमध्ये एन्ट्री झाल्याचा आनंद आहेच पण...'; 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांचंं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 5:05 PM

लापता लेडीजची ऑस्करमध्ये एन्ट्री झाल्यावर सिनेमातील मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांचं विधान चर्चेत (laapata ladies)

काल सर्व भारतीयांना एक आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे भारताकडून 'लापता लेडीज' सिनेमाची ऑक्सरमध्ये एन्ट्री झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. सिनेमाच्या टीमने त्यांचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केलाय. अशातच 'लापता लेडीज' सिनेमात मंजू माईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. छाया आनंदी आहेत पण त्यांना एका गोष्टीचं वाईटही वाटतंय. जाणून घ्या.

छाया कदम 'लापता लेडीज'च्या ऑस्कर एन्ट्रीबद्दल काय म्हणाल्या?

छाया कदम 'लापता लेडीज'च्या ऑस्कर एन्ट्रीबद्दल म्हणाल्या की, "मी खूप आनंदी आणि उत्सुक आहे. याशिवाय मी काय बोलू शकते? लापता लेडीजची ऑस्करसाठी निवड झाल्याने मला खूप अभिमान वाटतोय. दुसरीकडे फ्रान्सकडून माझा सिनेमा All We Imagine Is Light ला फ्रान्सकडून ऑस्करल प्रवेशासाठी पाठवण्यात आलं होतं. मी या सिनेमाच्या प्रीमीयरसाठी पॅरिसला आलीय. मी लापता लेडीजसाठी आनंदी आहेच, पण पायल कपाडियाच्या All We Imagine Is Light साठी मला वाईटही वाटतंय.  फिल्म फेडरेशनमधील दिग्गजांनी हा निर्णय घेतला असल्याने मला याविषयी काही बोलायचं नाही. परंतु माझ्या या दोन्ही सिनेमांना ऑस्करमध्ये बघण्यात मला जास्त आनंद झाला असता."

छाया कदम यांचा सिनेमा कान्समध्ये गाजलाय

छाया कदम यांचा All We Imagine Is Light हा सिनेमा जगात मानाच्या समजल्या जाणाऱ्या कान्स  फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलाय. काही महिन्यांपूर्वी ‘All We Imagine As Light’ या सिनेमाचा कान्स महोत्सवात प्रिमियर झाला. यावेळी सिनेमा संपल्यावर उपस्थित परदेशी प्रेक्षकांनी आणि थिएटरमधील सर्वांनी या सिनेमासाठी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. याक्षणी कॅमेरा जेव्हा छाया कदम यांच्यावर आला तेव्हा त्या या कौतुकाने भारावलेल्या दिसल्या. त्यांनी सर्वांना फ्लाईंग किस देऊन प्रेम दर्शवलं. अशाप्रकारे लापता लेडीज आणि All We Imagine Is Light हे छाया कदम यांचे दोन्ही सिनेमे जगभर नावाजले गेले आहेत.

टॅग्स :किरण रावआमिर खानऑस्कर