Join us

लगान फेम ग्रेसी सिंग अभिनय सोडून वळली अध्यात्माकडे, अजूनही केले नाही लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:47 AM

आमिर खानच्या लगान या चित्रपटात ग्रेसी सिंग मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण आता ग्रेसी काय करतेय हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

ग्रेसी सिंग अमानत या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली असल्याने तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. अमानत या मालिकेतील भूमिकेमुळेच हम आपके दिले में रहते है या चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील तिची भूमिका ही छोटीशी होती. पण तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. हम आपके दिल मे रहते है या चित्रपटानंतर ग्रेसीला एक मोठी लॉटरीच लागली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आमिर खानच्या लगान या चित्रपटात ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली. या चित्रपटातील तिची भूमिका, तिचे नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. ग्रेसी सिंग भारतीय नृत्यात पारंगत आहे आणि याचा पुरेपूर वापर या चित्रपटात करण्यात आला होता. या चित्रपटानंतर ती मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्तच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली. ग्रेसी आता बॉलिवूडमध्ये सेटल झाली असे वाटत असतानाच तिला चित्रपटात तितक्या चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. तिने तेलुगु, पंजाबी, गुजराती, मल्याळम, कन्नड, मराठी यांसारख्या अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले. एवढेच नव्हे तर काही बी ग्रेड चित्रपटातही झळकली होती. संतोषी माँ या मालिकेद्वारे ती पुन्हा छोट्या पडद्याकडे देखील परतली. पण तिला तिथे देखील आपला जम बसवता आला नाही. गेल्या काही वर्षांपासून तर ती चित्रपटसृष्टीपासून दूरच आहे.ग्रेसी सध्या काय करतेय हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ग्रेसी आता अध्यात्माशी जोडली गेली आहे. सध्या ती ब्रम्हकुमारी या संस्थेसाठी काम करते. या संस्थेच्या माऊंट टाबू येथील हेड क्वार्टरला ती नियमितपणे भेट देते. ती अध्यात्माकडे आज एवढी ओढली गेली आहे की, ती ३७ वर्षांची झाली असली तरी तिने अद्याप लग्नाचा विचार केलेला नाही. तिचा अद्याप तरी लग्नाचा काहीही विचार नसल्याचे तिने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे.  

टॅग्स :आमिर खान