Join us

नवऱ्याच्या आजारपणामुळे सोडली होती इंडस्ट्री, आता अशी दिसते लाल दुपट्टेवाली गाण्यातील रितू शिवपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:15 IST

रितू आता खूपच ग्लॅमरस झाली असून पहिल्यापेक्षा देखील अधिक सुंदर दिसते.

ठळक मुद्देरितू ही अभिनेता ओम व सुधा शिवपुरी यांची मुलगी. हरी व्यंकटसोबत रितूने लग्न केले.

90 च्या दशकातील ‘लाल दुप्पटेवाली...’ हे बॉलिवूड साँग तुम्हाला आठवत असेलच. यात गोविंदाची हिरोईन होती रितू शिवपुरी. ही रितू आज बॉलिवूडमधून गायब झालीये. गोविंदासोबतचा ‘आंखें’ हा रितूचा पहिला सिनेमा. 1993 साली रिलीज झालेल्या या सिनेमानंतर रितूचा एकही सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. आँखे चित्रपटानंतर रितू शिवपुरीने बऱ्याच चित्रपटात काम केले. हम सब चोर हैं, आर या पार, भाई भाई, हद कर दी आपने, लज्जा, शक्ति: द पावर व ऐलान या सिनेमात ती दिसली. रितूने काही वर्षं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. पण यश मिळत नाही म्हटल्यावर ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. आजारी पतीसाठी तिने करिअर सोडले.

यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिने बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिच्या पतीचे आजारपण आडवे आले. तिच्या पतीला ट्युमर झाल्याचे निदान झाले आणि त्याच्यासाठी रितूने करिअरवर पाणी सोडले. करिअरपेक्षा पतीचे आयुष्य महत्त्वाचे आहे, असा विचार करून तिने कमबॅकचा विचार सोडून दिला. मुलं मोठी झाल्यावर 2016 साली अनिल कपूरच्या ‘24’ या शोमधून तिने वापसी केली. रितूने बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केले.

रितू ही अभिनेता ओम व सुधा शिवपुरी यांची मुलगी. हरी व्यंकटसोबत रितूने लग्न केले. तिला तीन मुलं आहेत. रितूचे आईवडील आधीच बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. त्यामुळे इंडस्ट्री म्हणजे तिच्यासाठी दुसरे घर होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर रितूने मॉडेलिंग सुरू केले. याचदरम्यान एक दिवस पहलाज निहलाली यांनी तिला पाहिले आणि ‘आंखें’ हा सिनेमा तिला ऑफर केला. यावेळी ती 17 वर्षांची होती. 2006 मध्ये बॉलिवूड सोडल्यानंतर रितूने छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचे प्रयत्न केले. एका टीव्ही शोमध्ये ती दिसली. पण यासाठी तिला 18 ते 20 तास काम करावे लागायचे. ती कामावरून घरी परतायची तेव्हा नवरा झोपलेला असायचा. करिअरच्या नादात रितूचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. अखेर रितूने अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :बॉलिवूड