Join us

Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदींसोबतच्या सुष्मिता सेनच्या नात्यावर पहिल्यांदाच मुलगी रेनीची रिअ‍ॅक्शन आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:22 AM

Lalit Modi And Sushmita Sen: सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदींसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.

सुष्मिता सेन गेल्या एक आठवड्यापासून चर्चेत आहे. ललित मोदींनी आपले प्रेम काय व्यक्त केले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. कधी सुष्मिता सेनचे वडील, कधी वहिनी, जवळपास सर्वच कुटुंबातील सदस्यांनी या नात्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण सुष्मिता सेनच्या मुलींचे याबद्दल काय मत आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. आता सुष्मिताची मोठी मुलगी रेनीनेही तिच्या आईच्या डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर, सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदींसोबतच्या नात्यावरून ट्रोल होत आहे. या दरम्यान तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, त्याच्या कॅप्शनमध्ये तिने स्पष्ट केले की तिला आयुष्य तिच्या पद्धतीने जगायचे आहे, तिला तिच्या आनंदाची काळजी आहे, जग तिला काहीही म्हणत असले तरीही. त्याच वेळी, आईच्या सेल्फी पोस्टवर, तिची मुलगी रेनीने तिला पाठिंबा दिला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

सेल्फीमध्ये सुष्मिता सेन निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे, तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी गॉगलही घातला आहे. यासोबत सुष्मिता सेनने कॅप्शनमध्ये लिहिले, मी तुम्हाला आठवण करून देते की माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर मुलगी रेनीने पुढे जाऊन तिचे स्वागत केले आणि प्रेमाचा वर्षाव केला.

आईच्या पोस्टवर कमेंट करताना रेनीने लिहिले- 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बस्स विषय संपला. याशिवाय सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपा हिनेही नंदेला पाठिंबा देत लिहिले – होय, हो मीही. चारूने याआधीही तिच्या इन्स्टा स्टोरीद्वारे वहिनीला सपोर्ट केला आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदी