हरनाज संधू (Harnaaz Sandhu)ने मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा खिताब जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. 13 डिसेंबर 2021 हा ऐतिहासिक दिवस ठरला जेव्हा 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा खिताब भारतात परत आला. हरनाज सिंधूच्या आधी सुष्मिता सेन (1994) आणि लारा दत्ता (2000) यांनी हा खिताब जिंकला होता.
लाराने लिहिले- माझी प्रिय हरनाज, तू केवळ या विजयाच्याच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टींच्या लायक आहे. तुझा स्वतःवर अतूट विश्वास आहे. यासाठीच तुझा जन्म झाला हे तुम्हाला माहीत आहे. ज्या वर्षी तुझा जन्म झाला त्या वर्षी मी मिस युनिव्हर्स बनले. आम्ही तुझी खूप वाट पाहिली की तू येशील आणि भारतासाठी पुन्हा एकदा मुकुट घेऊन येशील. कदाचित हे नशीबात होते. लारा दत्ताने तिच्या पोस्टमध्ये हरनाज संधूला उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या.
हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. हरनाज ही चंदिगडची रहिवासी आहे. तिचा जन्म शीख कुटुंबात झाला. हरनाजला फिटनेस आणि योगाची आवड आहे. हरनाजने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये तिने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यापूर्वीच ती चित्रपटांकडे वळली होती. ती 'बाई जी कुटंगे' आणि 'यारा दियां पू बरन' या दोन पंजाबी सिनेमांमध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत