Join us

अखेर पूजा डडवालची आर्तहाक पडली सलमान खानच्या कानी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 3:41 PM

क्षयरोगाने ग्रस्त असलेली अभिनेत्री पूजा डडवाल हिच्या मदतीसाठी सलमान धावून येणार आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत त्याने पूजाला मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

अखेर अभिनेत्री पूजा डडवाल हिच्या मदतीसाठी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान धावून आला आहे. पूजा गेल्या काही दिवसांपासून टीबी आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराने ग्रस्त असून, ती मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयात सामान्य वार्डात उपचार घेत आहे. पूजाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असून, तिने सलमानकडे मदतीची याचना केली होती. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर करून आपल्या आजाराबद्दलची माहिती दिली होती. या व्हिडीओमध्ये तिने सलमानला मदत करण्यासाठी विनवणी केली होती. अखेर भाईजान सलमानने पूजाला मदतीचा हात दिला आहे. ALSO READ : ​१५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे सलमानची ‘ही’ अभिनेत्री; मदतीसाठी ‘हा’ सुपरस्टार आला धावून! ‘वीरगती’ या चित्रपटात पूजाने सलमानसोबत काम केले होते. त्यामुळेच पूजाने सलमानकडे मदत मागितली होती. तिने म्हटले होते की, मी सलमान खानला सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता पूजाचे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. सलमानची टीम लवकरच पूजाच्या मदतीसाठी तिच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पुणे येथे --- च्या पत्रकार परिषदेला संबोधित करणाºया सलमानला काही पत्रकारांनी पूजाच्या परिस्थितीवरून प्रश्न विचारले. ज्याचे उत्तर देताना सलमानने म्हटले की, ‘मला नुकतीच याबाबतची माहिती मिळाली आहे. तिच्या प्रकृतीबद्दल ऐकून मी खूपच दु:खी झालो. मला माहिती नव्हते की, ती या आजाराने ग्रस्त आहे. माझी टीम यावर काम करणार असून, लवकरच ती ठणठणीत होईल.  दरम्यान, भोजपुरी सुपरस्टार रवि किशनने पूजाला काही दिवसांपूर्वीच आर्थिक मदत केली. रवि सध्या हैदराबाद येथे त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करीत आहे. त्याचवेळी त्याला पूजाच्या प्रकृतीबद्दल माहिती झाले. त्याने लगेचच पूजाला काही फ्रुट्स आणि आर्थिक मदत तिच्यापर्यंत पोहोचविली. रवि किशन यांनी पूजाने दिग्दर्शक विनय लाड यांच्या चित्रपटात एकत्र काम केले होते. १९९७ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे नाव ‘तुमसे प्यार हो गया’ असे होते.