14 फेब्रुवारील जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या CRPF च्या ताफावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला होता. त्यानंतर मंगळवारी 26 फेब्रुवारीला भारताने या हल्ल्याचे पाकिस्तानला चोख उत्तर दिले. बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने १००० किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. या कारवाईनंतर भारतीय वायूसेना, सैन्य आणि सरकारचे सर्वत्र कौतुक होत झाले. बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना सलाम केला. तर पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी देखील बॉलिवूडचे कलाकार मागे राहिले नाही. या यादीत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान यांच्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नावदेखील सामील झाले आहे.
लतादीदी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला, 1 कोटी रुपयांची करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 1:13 PM
14 फेब्रुवारील जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या CRPF च्या ताफावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला होता.
ठळक मुद्दे बॉलिवूड स्टार्सनी भारतीय वायुसेनेना सलाम केला.पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना लतादीदी करणार 1 कोटींची मदत