Join us

अन् कुटुंबासाठी आयुष्यभर अविवाहित राहिल्या लता दीदी, स्वत:च सांगितलेले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 9:33 AM

लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले होते.

आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करणारी दिवंगत गायिका म्हणजे लता मंगेशकर (lata mangeshkar) यांची आज ९४ वी जयंती आहे. आज लता दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या सदाबहार गाण्यांची जादू प्रेक्षकांवर कायम असणारच आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९४२ साली केली होती. त्यांना महल चित्रपटातील  'आएगा आने वाला' या गाण्यातून लोकप्रियता मिळाली होती. लता मंगेशकर यांनी जगभरातील ३६ भाषेतील ५० हजारांहून जास्त गाणी गायली आहेत. कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर या आयुष्याभर अवाहित राहिल्या. 

लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले होते. आपल्या भाऊ-बहिणींना कधीही पालकांची कमतरता जाणवू दिली नाही. लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला होता. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला होता.

लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही पण त्यांनी त्यांच्या भावंडांना शिकवले. त्यांनी घरातली सर्व जबाबदारी खूप चांगल्याप्रकारे पेलली. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे त्यांनी कधीही लग्न केले नाही, असे म्हटले जात होते. लता मंगेशकर या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात होत्या. त्यांनी प्रेमाची देखील कबूल दिली होती. मात्र त्यांचे प्रेम त्यांना मिळू शकले नाही. लता मंगेशकर यांचं डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रेम होते, असे म्हणतात. लता मंगेशकर यांचं डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रचंड प्रेम होते. हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह एकमेकांचे चांगले मित्र होते. ते एकत्र क्रिकेट खेळायचे. जेव्हा राजा सिंह कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले होते, तेव्हा त्यांची ओळख झाली. यादरम्यान, त्यांचे घरी येणे-जाणेदेखील वाढले होते. लता दीदी आणि राज सिंह यांच्यातही मैत्री वाढली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तोपर्यंत लता दीदींच्या नावाचाही मोठ्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश झाला होता. मीडियामध्येही लता आणि राज यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. या दोघांनाही लग्न करायचं होते, मात्र ही गोष्ट सत्यात उतरू शकली नाही.

असे म्हटले जाते की, सर्वसामान्य घराण्यातील मुलीशी लग्न करणार नाही, असे वचन राज यांनी आपल्या आई-वडिलांना दिले होते. आयुष्याच्या शेवटापर्यंत राज यांनी हे वचन पाळलं आणि लता यांच्याप्रमाणेच ते आयुष्यभर अविवाहित राहिले.

 

टॅग्स :लता मंगेशकर