गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांचं आज सकाळी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लता दीदी कोरोना आणि न्यूमोनियातून बऱ्या झाल्या होत्या. पण काल रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच आशा भोसले (Asha Bhosle ) त्यांना भेटल्या होत्या. आपल्या बहिणीची तब्येत खालावल्याची बातमी ऐकताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली होती. आज सकाळी दींच्या निधनाची बातमीच आशा भोसले यांना मिळाली. मोठ्या बहिणीच्या निधनानंतर आशा दीदी शोकाकूल आहेत.
अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आशा ताईला प्रत्यक्ष भेटून त्यांचं सांत्वन केलं. या भेटीचा फोटो अनुपम यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आयुष्यातलं पराकोटींच दु:ख मनात लपवणारं हास्य नेहमीच सर्वात मोठं हास्य असतं. आपली प्रेमळ बहिण गमावल्याचं आशाजींचं दु:ख त्यांच्या या खिन्न हास्यातून मी अनुभवू शकतो. लता दीदींबद्दल त्यांच्याशी बोलणं माझ्यासाठीही कठीण होतं. आम्ही थोडं हसू आणि थोडी आसवं वाटून घेतली...,’असं कॅप्शन देत अनुपम यांनी आशा भोसलेंचा हा फोटो शेअर केला आहे. लतादीदींच्या निधनानंतरचा आशा भोसलेंचा हा पहिला फोटो आहे.
वडिलांच्या निधनानंतर लता दीदींनी जबाबदारी घेतली. त्यांनी गाण्याचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि खºया अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरूवात झाली. लता दीदींच्या गाण्याची साधना ही तेव्हा सुरू झाली. पण याच बरोबर आयुष्यातील कठीण प्रसंगांनी पाठ सोडली नव्हती. या प्रसंगात त्या
वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.