लता मंगेशकर यांना विष देऊन मारण्याचा झाला होता प्रयोग ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:56 AM
लता मंगेशकर हे नाव भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. बॉलिवूड संगीत लता दीदींच्या शिवाय पूर्ण होणे शक्यच नाही. दीदींचे मधुर ...
लता मंगेशकर हे नाव भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. बॉलिवूड संगीत लता दीदींच्या शिवाय पूर्ण होणे शक्यच नाही. दीदींचे मधुर स्वर कानावरुन पडून किती तरी जणांची आजही पहाट होते. जेवढे लता दीदींचे हितचिंतक होते तेवढेच प्रतिस्पर्धी ही. त्यांची लहान बहीण आशा भोसले आणि त्यांच्यातल्या कॉल्डवॉरची नेहमीच चर्चा रंगली. लता मंगशेकर यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न ही झाला असल्याचे त्यांनीच एकदा इंटरव्ह्यु दरम्यान सांगितले होते. या प्रसंगाचा उल्लेख लता मंगेशकर यांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेल्या पुस्तकात पद्मा सचदेव यांनी सुद्धा केला आहे. ही गोष्ट 1962 सालीची आहे ज्यावेळी दीदी 33 वर्षांच्या होत्या. एक दिवशी सकाळी त्या झोपून उठल्या आणि अचनाक त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात त्यांना हिरव्या रंगच्या उल्ट्या सुरु झाला. अचानक त्यांचा तब्येत एकदम खालावली. उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले. पुढचे तीन दिवस त्यांची परिस्थिती अशीच राहिली. त्यानंतर हळूहळू 10 दिवसांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. या कठिण प्रसंगी मजरुह सुल्तानपुरी यांनी त्यांची देखरेख केली होती. ऐवढेच नाही तर लता दीदींसाठी बनणारे जेवण आधी स्वत: ते खावून बघायचे. त्यानंतर ते जेवण लता दीदींना दिले जायचे. हे सगळे घडत असताना त्यांचा जेवण बनवणारा आचारी सुद्धा पळून गेला. त्यानंतर कळले की तो आणखीन काही स्टार्सच्या घरीसुद्धा काम करायचा. याचदरम्यान डॉक्टर्सनी सांगितले की, लता दीदींवर सौम्य विष प्रयोग करण्यात आला होता. हे ऐकल्यानंतर संगीत रसिकांसह बॉलिवूडलाही धक्का बसला होता. अनेक शोध घेऊन ही त्या आचारीचा पत्ता कुठे लागलाच नाही.ALSO READ : OMG : ‘या’ कारणाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न !लहान वयात लता दीदीं आपल्या संगीतातील करिअरला सुरुवात केली. मधुबालापासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळ्यांच अभिनेत्रीना त्यांनी आपला आवाज दिला. त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कारांनेदखील गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांचा सन्मान दादा साहेबर फाळके अॅवॉर्डनेसुद्धा करण्यात आले आहे.