एक दैवी स्वर आज कायमचा हरपला...! गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांच्या निधनानं अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. लता दीदी गेल्या 8 जानेवारीपासून रूग्णालयात भरती होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तोपर्यंत 92 वर्षाच्या लतादीदी सक्रीय होत्या. अगदी सोशल मीडियावरही त्या अॅक्टिव्ह होत्या. ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल त्यांनी ट्विटरवर शोक व्यक्त करणारं ट्विट केलं होतं. 4 जानेवारीला केलेलं ते त्यांचं अखेरचं ट्विट ठरलं.
4 जानेवारीलाच पंचम दा यांची पुण्यतिथी होती. त्याबद्दलही त्यांनी ट्विट केलं होतं. ‘आज हम सबके प्यारे पंचम की पुण्यतिथी है. उसने जितना भी संगीत बनाया वो सराहनीय था और आज भी लोकप्रिय है. मैं उनकी याद को विनम्र अभिवादन करती हूं,’असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं होतं.
कई बार मुझे ऐसा लगा कि वो मेरे पास बैठे हैं...
1 जानेवारी 2022 रोजी म्हणजे या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लता दीदींनी एक व्हिडीओ शेअर केला होता. वडिल दीनानाथ मंगेशकर यांच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या होत्या. ‘मेरे पूज्य पिताजी इतनी बड़ी दुनिया में हमें अकेला छोड़के चले गए. परंतु मैंने उन्हें हमेशा यहीं अपने पास पाया है. कई बार मुझे ऐसा लगा कि वो मेरे पास बैठे हैं, मुझे गाना सिखा रहे हैं. अगर कभी मुझे किसी बात का डर लगता था तो ऐसा लगता कि वो मेरे सिर पर हाथ रखकर कह रहे हों- डरो नहीं लता, मैं हूं. इसी तरह हमारे 50 वर्ष गुजरे हैं, अगर वो मेरे पास नहीं होते तो सोचिए, मुझे जैसी एक बहुत ही छोटी गायिका क्या उसे इतनी शोहरत इज्जत मिलती? मुझे नहीं लगता, ये उनका आशीर्वाद है जो आज मुझे मिला है,’त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
दीदींनी जून 2010 साली ट्विटर अकाउंट सुरु केलं होतं. तेव्हापासून 4 जानेवारी 2022 पर्यंत त्या ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होत्या. दीदींच्या ट्विटर अकाउंटचे तब्बल 14 कोटी 90 लाख फॉलोअर्स होते.