Join us

Lata Mangeshkar : इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेल्यात लता मंगेशकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 2:21 PM

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. मात्र त्यांच्याकडे गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

९२ वर्षीय भारतरत्न गानसम्राजी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे नुकतेच निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९४२ साली केली होती. त्यांना महल चित्रपटातील  'आएगा आने वाला' या गाण्यातून लोकप्रियता मिळाली होती. लता मंगेशकर यांनी जगभरातील ३६ भाषेतील ५० हजारांहून जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक दिग्गज गायकांसोबत गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी फक्त २५ रुपये मानधन मिळाले होते.

साधे राहणीमान असणाऱ्या लता दीदींची संपत्ती कोटींच्या घरात आहे. Trustednetworth.com च्या रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५ कोटी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच जवळपास ३६८ कोटी रुपये इतकी आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांनी ही संपत्ती कमावली आहे.

तसेच लता मंगेशकर यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे प्रभु कुंज भवन नामक घर आहे. या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. pressreader.comच्या अहवालानुसार, लता मंगेशकर या कारच्या शौकीन आहेत. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रायस्लर अशा अनेक शानदार फोर व्हिलर्स आहेत. इतकेच नाही तर 'वीर झारा' चित्रपटातील गाणं रिलीज झाल्यानंतर त्यांना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी एक मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती.  

टॅग्स :लता मंगेशकर