Join us

Rang De Basanti सिनेमातील Luka Chuppi गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी तब्बल ८ तास उभ्या राहिल्या होत्या लता दीदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 9:54 AM

Lata Mangeshkar Passed Away : अशात त्यांच्या काही खास गोष्टींचीही चर्चा होत आहे. त्यांचा 'रंग दे बसंती' सिनेमासंबंधी एक किस्सा चांगलाच प्रसिद्ध आहे.

Lata Mangeshkar Rang De Basanti Song  Luka Chuppi : भारतरत्न, स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचं नुकतंच दु:खद निधन झालं.  त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने इतकी वर्ष श्रोत्यांचं मनोरंजन केलं, भरभरून प्रेम दिलं त्या आता या विश्वात नाहीत, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावरही त्यांनी श्रद्धांजली वाहिली जात आहे. अशात त्यांच्या काही खास गोष्टींचीही चर्चा होत आहे. त्यांचा 'रंग दे बसंती' सिनेमासंबंधी एक किस्सा चांगलाच प्रसिद्ध आहे. यातील 'लुका छुपी' हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. 

'रंग दे बसंती' सिनेमातील 'लुका छुपी' गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. हे गाणं चांगलंच गाजलं. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं. हे गाणं संगीतकार ए.आर. रहमान यांनी कंपोज केलं होतं. तर शब्द प्रसून जोशी यांचे होते. हे गाणं मनाला भिडतं, त्यामागे लता मंगेशकर यांची मोठी मेहनत होती. जेव्हा लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं त्याआधी त्यांनी बरेच दिवस या गाण्याची रिहर्सल केली होती. इतकंच नाही तर गाणं रेकॉर्डींग केलं जात असताना त्या लागोपाठ आठ तास उभ्या होत्या.

याचा खुलासा स्वत: सिनेमाचे निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा यांन एका मुलाखतीत केला होता. त्यांनी या किस्स्याबाबत सांगितलं होतं की, या गाण्याचं शूटिंग १५ नोव्हेंबरला होणार होतं. पण लता मंगेशकर ९-१० नोव्हेंबरला चेन्नईला आल्या होत्या. लोकांना वाटलं की, त्या एखाद्या दुसऱ्या कामासाठी चेन्नईला आल्या असतील. पण नंतर समजलं की, त्या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी आधीच आल्या. 

त्या आल्यापासून रोज स्टुडिओमध्ये या गाण्याची रिहर्सल करत होत्या. त्यांनी सांगितलं की, रेकॉर्डींगच्या दिवशी त्यांनी लताजींसाठी रूममध्ये पाणी, खाण्याच्या काही वस्तू आणि खुर्ची ठेवली होती. पण त्यांनी त्यातील काहीच खाल्लं नाही आणि लागोपाठ ८ तास उभ्या राहून त्या गाण्याची रिहर्सल करत राहिल्या. 

टॅग्स :लता मंगेशकरबॉलिवूडसेलिब्रिटी