Join us

ओमपुरी यांच्या पत्नीची दिव्या दत्ताविरोधात तक्रार! जाणून घ्या काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 21:03 IST

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी अभिनेत्री दिव्या दत्ता, जावेद सिद्दीकी आणि अमरिक गिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कळतेय. 

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी अभिनेत्री दिव्या दत्ता, जावेद सिद्दीकी आणि अमरिक गिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कळतेय. हे प्रकरण एका नाटकाशी संबंधित आहे. ‘तेरी अमृता’ नामक पंजाबी नाटकाचा कॉपी राईट ओमपुरी यांच्या कंपनीकडे आहे. दिव्या दत्ताने हे नाटक नव्या रूपात रंगमंचावर आणण्याची तयारी सुरू केली होती आणि सोबतचं नाटकाचे हक्क खरेदी करण्याचे प्रयत्नही चालवले होते. पण चर्चा फिस्कटली आणि दिव्या दत्ताने परवानगीविनाचं हे नाटक रंगमंचावर आणण्याचा निर्णय घेतला. येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत याचे प्रीमिअरही ठेवण्यात आल़े. यावर आक्षेप घेत ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी दिव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

‘तेरी अमृता’मध्ये दिव्याने ओमपुरीसोबत काम केले आहे. या नाटकाचे प्रयोग पुढे चालू ठेवण्याची तिची इच्छा आहे. या पंजाबी नाटकाचा पहिला इंडियन एडेप्टेड प्रीमिअर १९९२ मध्ये झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. शबाना आझमी आणि फारूख शेखही यांनीही हे नाटक केले आहे.आता नंदिता यांच्या तक्रारीनंतर येत्या ९ सप्टेंबरला होणारा या नाटकाचा प्रयोग होतो की कायदेशीर कचाट्यात अडकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतवर्षी जानेवारीत ओमपुरी यांचे निधन झाले होते.

 

टॅग्स :ओम पुरी