सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार..... या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखणं सगळ्यात कठीण काम...अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. अशाच फिटनेस फ्रिकच्या यादीत अभिनेत्री उर्वशी रौतेलाही गणली जाते. नेहमीच तिचा वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे आता जगजाहीर झाले आहे. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल.
फॅशन आणि स्टाईलबद्दल बोलताना, बॉलिवूड सेलिब्रिटी बहुतेकदा ट्रेंड सेट करतात, हे पूर्णपणे त्यांच्या फिट बॉडीवर अवलंबून असते. पण या सर्वामागे त्याची मेहनत आणि जीममध्ये त्याने तासन् तास घाम गाळला आहे. जेणेकरून ते शूटिंगच्या दीर्घकाळात टिकू शकतील. शरीर निरोगी ठेवण्यासाठी बर्याच व्यायाम आणि योग्य डाएट फॉलो करणे हा एक उत्तम मार्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड सेलेब्स या संकल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवतात.
बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सध्या फिटनेसवर जास्त लक्ष केंदित करत आहे. उर्वशीचे फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तर तिचे फिटनेसप्रेम पाहून विविध टीप्सही चाहते विचारत असतात. उर्वशी रौतेला फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही. तिने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहे. त्यांचे ती नित्यनियमाने आणि काटेकोरपणे पालन करताना दिसते.