‘लवरात्री’चा वाद! सलमान खानला भर रस्त्यात मारणा-यास ५ लाखांचे बक्षिस!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 6:05 AM
अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. होय, सलमान खानचा जावई आयुष शर्माचा ‘लवरात्री’ हा चित्रपट येतोय, ...
अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. होय, सलमान खानचा जावई आयुष शर्माचा ‘लवरात्री’ हा चित्रपट येतोय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. नेमक्या याच चित्रपटामुळे सलमानने नवा वाद ओढवून घेतला आहे. एका हिंदू संघटनेने या चित्रपटाच्या नावाला विरोध करत, त्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे. उत्तर प्रदेशातील ‘हिंदू ही आगे’ या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख गोविंद पराशर यांनी सलमानला भर रस्त्यात मारणा-यास ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. पराशर यांनी संजय लीला भन्साळींच्या ‘पद्यावत’लाही तीव्र विरोध केला होता. सोबतच यातील लीड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण हिचे नाक कापणाºयास बक्षिण जाहीर केले होते.अलीकडे या संघटनेने सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या या चित्रपटाला विरोध नोंदवत, सलमानचा पुतळा जाळला. ‘लवरात्री’ हा चित्रपट हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. यात हिंदूंच्या नवरात्रीसारख्या उत्साहाचे विडंबन करण्यात आले आहे. चित्रपटाचे शीर्षकही अपमानास्पद आहे,असा या हिंदू संघटनेचे म्हणणे आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे रिलीज थांबवावे़ अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आयुष शमार्चा ‘लवरात्री’ हा चित्रपट यंदा ५ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून वरीना हुसेन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट गुजरातच्या भूमीवर आधारित आहे. नवरात्री हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून, अभिनेता-अभिनेत्रीमधील प्रेमाची जुगलबंदी यात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा नरेन भट्ट यांनी लिहिली असून, अभिराज मीनावाला यांचे दिग्दर्शन आहे. सुरुवातीला आयुषबरोबर अभिनेत्री मौनी रॉय झळकणार असल्याची चर्चा होती. परंतु आयुषने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्याने तिचा पत्ता कट झाला आणि वरीनाची वर्णी लागली. या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषबद्दल तसेही तुम्हाला ठाऊक आहेच. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती. ALSO READ : ‘लवरात्री’ रिलीज होण्याआधी ‘स्टार’ झाला सलमानचा मेहुणा आयुष शर्मा!