Join us  

"कायदा आणि सुव्यवस्था संपलीय...", कंगना राणौत रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'वर संतापली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:04 AM

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कंगना रणौतने रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'वर टीका केली होती.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कंगना रणौतने रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'(Animal Movie)वर टीका केली होती. कंगना राणौतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती 'ॲनिमल' चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये कंगना म्हणते, 'आता कोणत्या प्रकारचे चित्रपट बनत आहेत ते पहा. पितृसत्ताक चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालतो? हे बघून असं वाटतं की हे लोक कुठून येतात टाळ्या शिट्ट्या मारायला. जर मुलं कुऱ्हाडी घेऊन बाहेर पडले आणि रक्तरंजित हत्याकांड करण्यासाठी ते कुऱ्हाडी घेऊनच बाहेर पडले. तसेच कायदा व सुव्यवस्था त्यांना कोणी विचारत नाही. तो मशीनगन घेऊन शाळेत जातो. जणू काही पोलीसच नाहीत.

'ड्रग्स करण्यात मजा आहे'कंगना राणौत पुढे म्हणाली, 'कायदा आणि सुव्यवस्था संपली आहे, मला आणखी रक्तपात सांगा. का आहेत मृतदेहांचे ढीग? खूप मजा आहे. ना ते कल्याणासाठी आहे, ना सीमांसाठी आहे, ना ते लोककल्याणासाठी आहे. नुसती मजा, मस्ती. फक्त ड्रग्ज करण्यात मजा आहे.

कंगना राणौतने नाकारली ही ऑफररश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी सारखे स्टार्स रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले होते. 'ॲनिमल'च्या यशानंतर संदीपने कंगना राणौतसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्याला अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली. कंगना म्हणाली, 'कृपया मला कधीही चित्रपटाची ऑफर देऊ नका, अन्यथा तुमचे अल्फा पुरुष नायक स्त्रीवादी होतील आणि मग तुमच्या चित्रपटांनाही मार बसेल. तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवता. उद्योगाला तुमची गरज आहे.

या दिवशी ‘इमर्जन्सी’ प्रदर्शित होणार कंगनाचा 'इमर्जन्सी' ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे. यामध्ये श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, अनुपम खेर, मिलिंद सोमण आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :कंगना राणौतरणबीर कपूर