सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पोलिसात ७ पानांची तक्रार दिली. FIR मध्ये लिहिले की, सुशांतला भीती होती की, रिया त्याला त्याच्या एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूच्या केसमध्ये अडकवेल. सुशांतच्या मृत्यूनंतर असंही समोर आलं होतं की, सुशांतने सुसाइडआधी अनेकदा गुगल चेक केलं होतं. सुशांतच्या फॅमिली लॉयरने सांगितले की, तो दिशाच्या मृत्यूने चिंतेत होता.
रिया चक्रवर्तीवर केस झाल्यावर सुशांतच्या वडिलाचे वकील विकास सिंह यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकास यांनी सांगितले की, दिशाच्या मृत्यूचा सुशांतच्या मेंटल हेल्थवर फार परिणाम झाला होता. त्यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुशांतला भीती होती की, त्याला या प्रकरणात फसवलं जाऊ नये. हेही समोर आलं आहे की, तो सतत गुगल चेक करत होता.
विकास यांनी सांगितले की, आधी रिया गेली आणि त्याच रात्री दिशा सालियानचं निधन झालं. बातम्यांमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या माजी मॅनेजरची आत्महत्या अशा हेडींग होत्या. या स्थितीत सुशांत अधिक घाबरला होता की, दिशाच्या केसमध्ये त्याला अडकवलं जाऊ नये. त्यामुळेच तो सतत गुगल चेक करत होता. रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता. ज्यामुळे तो अधिकच निराश होता.
वकील विकास यांनी सांगितले की, सुशांतची मेंटल कंडिशन पाहता रियाने त्याला सोडून जायचं होतं का? रियाने नंबर ब्लॉक केल्याने तो आणखी वैतागलेला होता. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात सुशांतला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याची केस दाखल केली आहे.
हे पण वाचा :
अंकिता लोखंडेला दिली जाणार पोलिस सुरक्षा? कुणापासून आहे धोका?
'मुंबई पोलिसांपैकी कोणीतरी रियाला मदत करत आहे'; वकील विकास सिंह यांचा गंभीर आरोप