Join us

लक्ष्मीचा खरा हिरो अक्षय नाही तर शरद केळकर? सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा

By गीतांजली | Published: November 10, 2020 7:39 PM

शरद केळकरने चित्रपटात पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स दिला आहे.

अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी' सोमवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तामिळ हॉरर कॉमेडी चित्रपट कांचनाचा रिमेक असलेला लक्ष्मी हिंदी रीमेक आहे. यात अक्षय कुमारने एका मुस्लीम मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे, ज्याच्या अंगात किन्नरचे भूत येते. जरी ट्रेलरमध्ये शरद केळकर कोठेही दिसत नव्हता, परंतु चित्रपटात त्याने अचानक येऊन सगळ्यांना सरप्राईज दिले आहे. 

 शरद केळकरची सिनेमात तेव्हा एंट्री होतो जेव्हा लक्ष्मीचा आत्मा तिच्या मृत्यूची कहाणी सांगत असतो. सिनेमात त्याच्या एंट्रीपासून अभिनयापर्यंच सगळे काही दमदार आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारपेक्षा जास्त कौतुक शरद केळकरचे केले जाते आहे. यूजर्स शरद केळकरच्या कामाचे खूप कौतुक करतायेत. 

शरदने सिनेमात 13 ते 15 मिनिटांची भूमिका साकारली असली तरी तिला पूर्णपणे न्याय दिला आहे. एक यूजरने  ट्विटमध्ये 'तान्हाजी' चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील शरद आणि 'लक्ष्मी' चित्रपटातील लूकचा कोलाज बनवत शेअर केला आहे. अक्षय कुमार चित्रपटाचे हृदय असला तर शरद केळकरच त्याचा आत्मा आहे.

 

 

दुसऱ्या यूजरने लिहिले, शरद केळकरने लक्ष्मीच्या भूमिकेला न्याय दिला. या सिनेमानंतर अभिनेता शरद केळकरचा मी खूप सन्मान करायला लागलो आहे. आणखी एक यूजरने लिहिले, अक्षय कुमारचा खूप मोठा फॅन आहे मात्र या सिनेमाचा खरा हिरो शरद केळकर आहे. त्याचा परफॉर्मेन्स कमाल आहे.  

 

टॅग्स :शरद केळकरअक्षय कुमार