Join us

जाणून घ्या, ​‘झिरो’मध्ये शाहरूख खान कसा बनला बुटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 5:50 AM

शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट ‘झिरो’त एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरूखसारखा उंचपुरा अभिनेता बुटक्या व्यक्तिची भूमिका ...

शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट ‘झिरो’त एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरूखसारखा उंचपुरा अभिनेता बुटक्या व्यक्तिची भूमिका कशी साकारू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. पण याचे उत्तर द्यायचे झाल्यास केवळ एकच आहे. ते म्हणजे, स्पेशल इफेक्ट्स. होय, या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी अतिशय अ‍ॅडव्हान्स व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला गेला आणि हे बनवायला दोन वर्षे खर्ची घालावी लागलीत.  यापूर्वीही अनेक चित्रपटात याच तंत्राचा वापर करून लहानाला मोठे आणि मोठ्याला लहान दाखवण्यात आले आहे. ‘जानेमन’मध्ये अनुपम खेर आणि ‘अप्पू राजा’मध्ये कमल हासन यांनीही बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारली आहे. याशिवाय हॉलिवूडमध्येही हे तंत्र वापरले गेले आहे. हे तंत्र कुठले, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे तंत्र आहे फोर्स्ड परस्पेक्टिव. फोर्स्ड परस्पेक्टिव   या तंत्रात आॅप्टिकल इल्यूजनच्या मदतीने आॅबजेक्टला लहान, मोठे, दूर वा जवळ दाखवले जावू शकते. या तंत्राद्वारे शाहरूखलाही त्याच्या जवळपासच्या लोकांपेक्षा व वस्तूंपेक्षा लहान दाखवले गेलेय. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटात यापूर्वी या तंत्राचा वापर केला गेला आहे. द हॉर्बिट आणि लॉर्ड आॅफ द रिंग्स यासारख्या हॉलिवूडपटात याच तंत्राच्या मदतीने अनेक लोकांना त्यांच्या खºया उंचीपेक्षा कितीतरी कमी उंचीचे दाखवले गेले होते. लॉर्ड आॅफ द रिंग्समध्ये बुटक्या आणि उंच अशा दोन्ही पात्रांचे शूटींग वेगवेगळे झाले होते. नंतर त्यांना एकत्र केले गेले होते.फोर्स्ड परस्पेक्टिवशिवाय अशा चित्रपटांसाठी ‘क्रोमा की’ हे आणखी एक तंत्र वापरले जाते. यात ग्रीन स्क्रिनमध्ये सीन शूट करून त्याचे बॅकग्राऊंड बदलले जाते. ‘झिरो’चा टीजर रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो समोर आला होता. या फोटोवरून चित्रपटाचे शूट ग्रीन स्क्रिनवर झाल्याचे दिसते.ALSO READ : शाहरूख खानच्या ‘झिरो’ लूकची नेटक-यांनी घेतली मजा!!आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय.शाहरूखने अलीकडे म्हटल्यानुसार, हा एक अतिशय कठीण चित्रपट होता. तो बनवायला दोन वर्षे लागलेत.