Join us

​ जाणून घ्या, स्टार किड्सची काही आगळीवेगळी नावे आणि त्याचा अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 5:53 PM

गत मंगळवारी करिना कपूर आणि नवाब सैफ अली खान यांना पुत्ररत्न झाले. करिना व सैफने मोठ्या आनंदाने या बाळाचे ...

गत मंगळवारी करिना कपूर आणि नवाब सैफ अली खान यांना पुत्ररत्न झाले. करिना व सैफने मोठ्या आनंदाने या बाळाचे नाव तैमूर अली खान पतौडी ठेवले. हे नाव सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि काही तासांत या नावाची खिल्ली उडवली जाऊ लागली. नेटिजन्सनी या नावावर बरेच आक्षेप नोंदवले. सैफिनाला मुलासाठी दुसरे कुठले नाव मिळाले नाही का? असा प्रश्न विचारण्यापर्यंत नेटिजन्सची मजल गेली. खरे तर तैमूर या नावाचा अर्थ होतो पोलाद. पण तैमूर लंग नावाचा १४ व्या शतकात एक शासक होता. त्याने तैमूरी राजवंशाची स्थापना केली होती.  तैमूर इस्लामचा कट्टर अनुयायी होता. शिवाय तो फार महत्त्वकांक्षीही होता.  या महत्त्वाकांक्षी शासकाची प्रतिमा फारशी चांगली नसल्यामुळे  सैफिनाने आपल्या छोट्सा नवाबाचे नामकरण तैमुर अली खान करावे, याबद्दल नेटिजल्सची आक्षेप नोंदवला.  तैमूर नावावरून निर्माण झालेला वाद वेगळा हा एक वेगळा भाग. पण बॉलिवूड स्टार्सच्या किड्सच्या नावांकडे एक नजर टाकल्यास यातील अनेक नावे काहीशी वेगळी आणि ऐकायला विचित्र आहेत. अशाच काही स्टार किड्सच्या नावांवर एक नजर....शाहीद कपूरशाहीद कपूर आणि त्याची बेटर हाफ मीरा राजपूत यांना अलीकडे कन्यारत्न झाले. आपल्या लाडक्या मुलीचे शाहीद व मीराने मीशा असे नामकरण केले. मीरा आणि शाहीद या आपल्या नावातील आद्याक्षर घेऊन मीशा हे नाव तयार झालेय.अर्शद वारसीअभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. अर्शदच्या मुलाचे नाव आहे, जेक जिदान आणि मुलीचे नाव आहे, झेन झो. जेक जिदान या अरबी भाषेतील शब्दाचा अर्थ आहे, देवाचे स्मरण. तर झेन झो या शब्दाची उत्पत्ती आफ्रिकन भाषेतील आहे. याचा अर्थ होतो, सुंदर.फराह खानकोरिओग्राफर, डायरेक्टर आणि अ‍ॅक्ट्रेस अशी ओळख असलेल्या फराह खान हिला दोन मुली आणि एक मुलगा अशी तिळी मुले झालीत. फराहने आपल्या मुलींची नावे ठेवलीत दिवा आणि अन्या. तर मुलाचे नाव ठेवले जार. जार या लॅटीन भाषेतील शब्दाचा अर्थ आहे सम्राट. तर अन्याचा अर्थ आहे अनुग्रह.संजय दत्तसंजय दत्तची दुसरी पत्नी म्हणजे मान्यता दत्त. संजय व मान्यता यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन जुळी मुले आहेत. यापैकी मुलाचे नाव आहे शाहरान आणि मुलीचे नाव आहे, इकरा. पारशी भाषेत शाहरानचा अर्थ होतो,शाही योद्धा तर इकरा या हिब्रूतील शब्दाचा अर्थ होतो, दीक्षा देणे.करिश्मा कपूरकरिना कपूरची लाडकी बहिण हिने अलीकडे पती संजय कपूरशी घटस्फोट दिला. करिश्मा व संजयची दोन मुले आहे. करिश्माने मुलीचे नाव ठेवलेय समायरा तर मुलाचे नाव ठेवलेय, कियान. कियान हे नाव तुम्ही कधी ऐकलेले नसेल. अमेरिकन हिबु्र भाषेत कियानचा अर्थ होतो ‘ग्रेस आॅफ गॉड’ अर्थात देवाचा आशीर्वाद.अर्जून रामपालअर्जून रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका या दोघांना दोन गोड मुली आहेत. यापैकी एकीचे नाव आहे महिका. तर दुसरीचे नाव आहे मायरा.  मायरा या शब्दाचा अर्थ होतो सुंदर आणि निष्पाप. हा मूळचा ग्रीक शब्द आहे.​रितेश देशमुखरितेश देशमुख व त्याची गोड पत्नी जेनेलिया देशमुख यांची दोन मुले म्हणजे रिआन आणि राहिल. रिआनचा अर्थ होतो छोटा राजकुमार तर राहिलचा अर्थ होतो निरागस.अरबाज खान अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांचे नाते संपुष्टात आलेय. दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. या दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान. अरहान हा अरेबिक शब्द. अरहानचा अर्थ होतो सत्ताधीश.