जाणून घ्या, टायगर श्रॉफ व दिशा पटनीच्या ‘लिव्ह इन’वर काय म्हणाला जॅकी श्रॉफ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 9:10 AM
टायगर श्रॉफ एका मुलीसाठी आपल्या आई-वडिलांचे घर सोडणार, अशी धक्कादायक बातमी आम्ही कालच तुम्हाला दिली. आता ही मुलगी कोण? ...
टायगर श्रॉफ एका मुलीसाठी आपल्या आई-वडिलांचे घर सोडणार, अशी धक्कादायक बातमी आम्ही कालच तुम्हाला दिली. आता ही मुलगी कोण? तर हेही तुम्हाला ठाऊक आहेच. ही मुलगी म्हणजे दिशा पटनी. टायगर व दिशा पटनी दोघांनीही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दिशाने अलीकडेच वांद्रयात एक फ्लॅट घेतला आहे. ती या फ्लॅटमध्ये शिफ्टही झालीय. हा फ्लॅट घेण्याआधी तिने टायगरचा सल्ला घेतला होता. केवळ सल्लाच नाही तर काहींच्या मते, टायगर व दिशा या दोघांनी मिळून हा फ्लॅट खरेदी केला आहे. लवकर टायगरही दिशासोबत या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याच्या विचारात आहे,असे कळतेय. आता असे झाल्यास टायगरचे पापा अर्थात जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया काय असेल, हेच जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. जॅकीचे मानाल तर टायगर दिशासोबत लिव्ह-इनमध्ये राहणार असल्याचे सध्या तरी त्याला ठाऊक नाही. म्हणजे अद्याप टायगरने त्याचा प्लान जॅकीला सांगितलेला नाही. म्हणजे एकार्थाने मीडियाकडून त्यांना ही बातमी कळली आहे. आता या बातमीने जॅकीला खूप मोठा धक्का वगैरे बसला असेल किंवा मुलगा घर सोडून जाणार या कल्पनेने तो निराश झाला असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण जॅकीच्या मते, आज नाही तर उद्या असा निर्णय टायगरने घेतलाच तर त्याला त्यावर काहीही आक्षेप नसेल. ‘टायगर सध्या लहान आहे. सध्यातरी शिफ्ट होण्याचे त्याचे प्लानिंग आहे, असे मला वाटत नाही. त्याने याबाबत मला काहीही सांगितलेले नाही. पण प्रत्येकजण एक पार्टनर शोधतो, लग्न करतो आणि सेटल होतो. उद्या टायगरला कुणासोबत शिफ्ट व्हावे वाटलेच, तर माझा त्यावर काहीही आक्षेप नसेल. पण मी टायगरला जितका ओळखतो त्यानुसार, तो असे काही करणार नाही, हेच मला वाटतेय,’असे जॅकी म्हणाला.आता जॅकीच्या या बोलण्यावरून टायगरला ग्रीन सिग्नल मिळालायं, असे वाटतेय. खरे काय, ते टायगरलाच ठाऊक!ALSO READ : It's shocking! ‘या’ मुलीसाठी टायगर श्रॉफ सोडणार आई-वडिलांचे घर!!