Join us  

​ नवाजुद्दीन सिद्दीकीला पहिल्या प्रेयसीने पाठवले कायदेशीर नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 8:23 AM

नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ हे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशनाआधीच वादात सापडले. इतके की, प्रकाशनानंतर उण्यापु-या आठ दिवसांत नवाजुद्दीनला ते ...

नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ हे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशनाआधीच वादात सापडले. इतके की, प्रकाशनानंतर उण्यापु-या आठ दिवसांत नवाजुद्दीनला ते मागे घ्यावे लागले. पूर्वप्रेयसींची माफी मागून नवाजने आपली ही बायोग्राफी बाजारातून मागे घेत असल्याचे जाहिर केले. ‘माझ्या बायेग्राफीमुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे त्याने स्पष्ट केले. पण कदाचित इतकेच पुरेसे नाहीय. कारण नवाजने बायोग्राफी मागे घेऊनही हा वाद थांबलेला नाही. होय, लोकप्रीय रंगभूमी कलाकार व टीव्ही अभिनेत्री सुनीता राजवार हिने याप्रकरणी नवाजला कायदेशीर नोटीस बजावले आहे.ALSO READ: ​नवाजुद्दीन सिद्दीकीने मागितली पूर्वप्रेयसींची माफी; बायोग्राफी घेतली मागे!आपल्या बायोग्राफीत नवाजने सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन स्त्रियांचा उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल सविस्तर लिहिले होते. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरिरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने या पुस्तकातून दिली होती.  निहारिकाबद्दल तर त्याने अगदीच खुलेपणाने लिहिले होते. निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे,असे नवाजने यात म्हटले होते.नवाजच्या या खुलाशावर निहारिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. नवाजची बायोग्राफ पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे तिने म्हटले होते.   नवाजची पूर्वप्रेयसी सुनीता राजवार हिनेही या बायोग्राफीवर आक्षेप नोंदवला होता. मी गरिब असल्याने सुनीताने मला सोडले, असे नवाजने बायोग्राफीत लिहिले होते. पण सुनीताने नवाजचा हा दावा फेटाळून लावला होता. आता तिने नवाजला थेट नोटिस पाठवले आहे. केवळ नवाजलाच नाही तर या बायोग्राफीची लेखिका रितुपर्णा चॅटर्जी हिलाही सुनीताने कायदेशीर नोटीस जारी केले आहे. नवाजच्या कपोलकल्पित व अतिरंजक बायोग्राफीमुळे आपल्याला खासगी आयुष्यात अपमानास्पद स्थितीचा सामना करावा लागला. नवाजने ही बायोग्राफी बाजारातून रद्द केल्याचा दावा केला असला तरी अद्यापही या पुस्तकाचे वितरण सुरु आहे. या बायोग्राफीद्वारे आपली मानहानी केल्याबद्दल नवाजने माफी मागावी तसेच अबु्रनुकसानीच्या भरपाईदाखल  २ कोटी द्यावेत, अशी मागणही या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.