Join us

RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 08:57 IST

रे के पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. मात्र, यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलीही विस्तृत किंवा सविस्तर माहिती देण्यात आली नाही.

भारतीय सिनेमा क्षेत्रात दाक्षिणात्य चित्रपट RRR ने ऑस्कर मिळवत दैदिप्यमान कामगिरी केली. चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला हा ऑस्कर मिळाला असून चित्रपटाचेही मोठं कौतुक झालंय. या सिनेमाने भारतासह जगभरात मोठी कामगिरी केली. राजमौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात व्हिलनची भूमिका केलेल्या अभिनेता रे स्टीव्हनसन यांचं निधन झालं आहे, ते ५८ वर्षांचे होते. विशेष म्हणजे तीन दिवसांनंतर २५ मे रोजी त्यांचा ५९ वा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

रे के पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. मात्र, यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलीही विस्तृत किंवा सविस्तर माहिती देण्यात आली नाही. रे स्टीव्हनसन यांनी ग्लोबल हिट ठरलेल्या RRR सिनेमात व्हिलनची भूमिका साकारली होती. स्कॉट बक्सटन नावाच्या राजाचा रोल त्यांनी केला होता. आपल्या अभिनयातून त्यांनी जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषत: भारतीय सिनेरसिकांनीही त्यांच्या अभिनयाचं आणि भूमिकेचं कौतुक केलं. 

RRR शिवाय रे यांनी मार्वल यांचा चित्रपट 'थॉर' मध्ये काम केलं आहे. नुकतेच रे स्टीव्हनसन यांना हिस्टॉरिकल ड्रामा फिल्म '1242: गेटवे टू द वेस्ट' मध्ये पाहण्यात आलं होतं. लवकरच ते डिज्नी प्लस हॉटस्टारची सीरीज Ahsoka चि हिस्सा बनणार होते. अभिनेता रे स्टीव्हनसन यांचा जन्म २५ मे १९६४ रोजी नॉर्थ आयरलँडजवळील लिसबर्न येथे झाला होता. त्यांनी १९९० च्या सुरुवातीला आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. तेव्हा ते युरोपियन टेलिव्हीजन आणि सिनेमांत झळकत होते. 

 

टॅग्स :आरआरआर सिनेमासिनेमामृत्यूबॉलिवूड