अर्जुन रेड्डी स्टार विजय देवरकोंडा(Arjun Reddy) चा मोस्ट अवेटेड ‘लाइगर’ (Liger) चित्रपटत थिएटरमध्ये रिलीज झालाय. चित्रपटाची टीम आणि स्टारकास्ट रिलीजबद्दल खूप उत्सुक होते. यामध्ये आपल्या बॉक्सिंगचा गॉडफादर म्हणवल्या जाणाऱ्या माईक टायसन (Mike Tyson) नेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विजय देवरकोंडाने सेटवर त्याच्यासोबत शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. टायसनने सेटवर विजयला मस्तीत इंग्रजी शिवगाळ केल्याचा खुलासा केला आहे. या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये डेब्यू करतो आहे.
विजय देवरकोंडा यांनी माइक टायसनबाबत केला खुलासा लायगर सिनेमात विजय आणि माईक टायसन (Mike tyson-Vijay Deverakonda) यांच्यात काही फायटिंग सीन्स आहेत. त्यासाठी जवळपास दोन वर्षे ट्रेनिंग देण्यात आली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने खुलासा केला की या प्रतिष्ठित बॉक्सरने चित्रपटाच्या सेटवर त्याची थट्टा केली होती. तेही इंग्रजीत. ती अशी होती की अभिनेत्याने सांगण्यास नकार दिला. मात्र, टायसन हा एक चांगला माणूस असून त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अप्रतिम असल्याचेही त्याने आवर्जुन सांगितले.
‘लाइगर’ हा सिनेमा पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होतोय. साहजिकच विजय देवरकोंडाच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विजय देवरकोंडाच्या अपोझिट अनन्या पांडे लीड रोलमध्ये आहे. अनन्या या चित्रपटातून साऊथमध्ये एंट्री करतेय.. त्याचवेळी रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांसारखे इतर कलाकारही भूमिकेत दिसणार आहेत.