Join us

Liger vs The Legend : विजय देवरकोंडा माईक टायसनला पहिल्यांदा भेटतो तेव्हा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 10:26 AM

Liger : अमेरिकेत पोहोचताच Vijay Deverakondaने Mike Tysonसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे.

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या ‘लायगर’ (Liger ) या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) व अनन्या पांडे शूटींगसाठी नुकतेच अमेरिकेला पोहोचले आहेत. येथे काय तर विजय देवरकोंडा थेट बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसनला (Mike Tyson ) भिडणार आहे. अमेरिकेत पोहोचताच देवरकोंडाने टायसनसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे.‘हे माझे प्रेम आहे. मी प्रत्येक क्षण आठवणीच्या कुपीत बंद करतोय... लायगर वर्सेस द लीजेंड माईक टायसन... माईक टायसनला पहिल्यांदा भेटलो तो क्षण...,’असे कॅप्शन देत देवरकोंडाने हा फोटो शेअर केला आहे.

अ‍ॅक्शन आणि स्टंटची भरमार असलेल्या ‘लायगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा व माईक टायसनची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. माईक टायसनने म्हणे या चित्रपटासाठी विजय देवरकोंडापेक्षाही अधिक फी घेतली आहे.  म्हणायला माईकची भूमिका फार मोठी नाही. तो कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याचीही चर्चा आहे. पण तरिही या चित्रपटासाठी त्याने तगडी फी वसूल केली आहे. माईक मोठा लीजेंड आहे. जगभरात त्याचं नाव आहे. साहजिकच त्यानं तोंडातून काढलेली रक्कम त्याला मिळाली.हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा तयार होतोय. विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण खरी उत्सुकता देवरकोंडा आणि टायसनच्या जोडीची आहे. ही जब्राट जोडी पडद्यावर काय धम्माल करते, ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

माईक टायसनचं नाव जगातील सर्वात महान बॉक्सरमध्ये घेतलं जातं.  1985 ते 2005 पर्यंत बॉक्सिंग क्षेत्र गाजवणाºया याच माईकवर 1992 साली बलात्काराचे आरोप झाले होते. ते आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला 6 वर्ष कारवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर माईक 1995 मध्ये जेलमधून बाहेर पडला होता. बॉक्सिंग पाठोपाठ तो अभिनय क्षेत्रातही कार्यरत झाला. तो 2009 मध्ये आलेल्या 'हँगओव्हर' या हॉलिवूड चित्रपटात दिसला होता. ‘लायगर’बद्दल सांगायचं तर करण जोहरची निर्मिती असलेला हा सिनेमा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे दिग्दर्शित करणार आहेत. पुरी हे प्रसिद्ध तेलगू चित्रपट दिग्दर्शक आहेत.  पोक्किरी,गोलीमार, टेंपर सारखे हिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. शर्त-दी चॅलेंज आणि बुड्ढा होगा तेरा बाप हे दोन बॉलिवूड सिनेमेही त्यांनी दिग्दर्शित केले होते.

टॅग्स :विजय देवरकोंडा