डिज्नीचा ‘द लायन किंग’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 19 जुलैला प्रदर्शित झालेला या लाईव्ह अॅनिमेटेड चित्रपटाने केवळ सात दिवसांत 75 कोटींवर कमाई केली आहे.बच्चेकंपनीच्या पसंतीत उतरलेल्या या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 11.06 कोटींची कमाई केली. दुसºया दिवशी ही कमाई 19.15 कोटींवर पोहोचली. रविवारी 24.54 कोटी, सोमवारी 7. 90 कोटी, मंगळवारी 7.02 कोटी आणि बुधवारी 6.25 कोटी कमावत या चित्रपटाने एकूण 75.92 कोटींचा गल्ला जमवला. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. पण हिंदी भाषेतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणा-या सिम्बाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील मुफासा या पात्राला शाहरूख खानने आपला आवाज दिला असून सिम्बा या अॅनिमेटेड पात्राला शाहरूखचा मुलगा आर्यन खान याने आवाज दिला आहे.
सुपर 30 ने गाठला 110 कोटींचा पल्ला
हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. काल बुधवारपर्यंत या चित्रपटाने 110.68 कोटींची कमाई केली. गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये टॅक्स फ्रि करण्यात आला आहे. याचा चित्रपटाला मोठा फायदा होताय.
उद्या प्रदर्शित होणार ‘जजमेंटल है क्या’
तूर्तास ‘सुपर 30’ व ‘द लायन किंग’ हे दोन्ही सिनेमे एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. पण उद्या 26 जुलैला कंगना राणौतचा ‘जजमेंटल है क्या’ प्रदर्शित होतोय. अशात या चित्रपटासमोर ‘सुपर 30’ व ‘द लायन किंग’ किती टिकाव लागतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.