Join us

Lipstick under my burkha : कबीर खानने सेन्सॉर बोर्डाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 4:51 PM

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा महिला प्रदान असून, यात सेक्स सीन्सचा अक्षरश: भडीमार केला आहे. त्याचबरोबर चित्रपटात अश्लील ...

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा महिला प्रदान असून, यात सेक्स सीन्सचा अक्षरश: भडीमार केला आहे. त्याचबरोबर चित्रपटात अश्लील शब्दप्रयोग केलेला असून, समाजातील एका विशेष वर्गातील संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करणारा आहे’ असा निर्वाळा देत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ग्रीन सिग्नल देण्यास नकार दिला. मात्र दिग्दर्शक कबीर खान यांनी सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत, बोर्डाला फटकारले आहे. गेल्या शुक्रवारी ‘द स्ट्रेंज स्माइल’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगला आलेल्या दिग्दर्शक कबीर खान यांनी म्हटले की, सेन्सॉर बोर्डाचे अशाप्रकारचे निर्णय खरोखरच संतापजनक आहेत. विशेष म्हणजे वारंवार अशाप्रकारचे निर्णय देऊन सेन्सॉर बोर्ड नेमकं काय साध्य करू इच्छिते, याचाच अद्यापपर्यंत उलगडा झाला नाही. चित्रपट बघणे हा ज्याचा-त्याचा स्वैच्छिक निर्णय आहे. त्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जात नाही. त्यामुळे सीबीएफसीच्या दोन-तीन लोकांनी अशाप्रकारचे निर्णय घेऊन समाजाचे नेतृत्त्व करण्याचा विचार करून नये. हा निर्णय पूर्णत: हास्यास्पद आहे. पुढे बोलताना कबीर खान यांनी म्हटले की, आपण भारताला वैश्विक शक्ती म्हणून संबोधतो. परंतु अशाप्रकारचे निर्णय न शोभणारे आहेत. सेन्सॉरच्या या निर्णयाविरोधात इंडस्ट्रीतील प्रत्येकांनी एकजूट होऊन आपल्या अधिकारासाठी लढायला हवे. जोपर्यंत आपण आपला आवाज बुलंद करणार नाही, तोपर्यंत सेन्सॉरचा मनमानी कारभार थांबणार नाही, असेही कबीर खान यांनी म्हटले. कबीर खानप्रमाणेच श्याम बेनेगल, फरहान अख्तर आणि अशोक पंडित यांनीदेखील सेन्सॉरच्या या निर्णयाचा खरपूच समाचार घेतला. दरम्यान, सिनेमाच्या दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांनीही सेन्सॉरच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, महिलांचा आवाज दाबण्याचा सेन्सॉर प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा आणि अहाना कुमरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपटाला टोकियो येथे आयोजित केलेल्या आंतरराष्टÑीय फिल्म महोत्सवात ‘स्पिरिट आॅफ एशिया’ आणि मुंबई फिल्म महोत्सवात लैंगिक समानतेसाठी सर्वश्रेष्ठ फिल्म या कॅटिगिरीत ‘आॅक्सफॅम अवॉर्ड’ मिळाला आहे.