Join us

​अखेर लीजा हेडनने जगाला दाखवला मुलगा जॅकचा चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 8:38 AM

अभिनेत्री लीजा हेडन सध्या मुलगा जॅक याच्या संगोपनात बिझी आहे. मे २०१७ मध्ये लीजाने जॅकला जन्म दिला. येत्या मे महिन्यात जॅक एक वर्षाचा होतो आहे.

अभिनेत्री लीजा हेडन सध्या मुलगा जॅक याच्या संगोपनात बिझी आहे.   मे २०१७ मध्ये लीजाने जॅकला जन्म दिला. येत्या मे महिन्यात जॅक एक वर्षाचा होतो आहे. जॅकच्या जन्मापासून लीजा त्याचे फोटो शेअर करत आलीय. पण या सर्व फोटोत जॅॅकचा चेहरा तिने मोठ्या चतुराईने लपवला होता. अलीकडे एका मॅगझिनसाठी लीजाने जॅकसोबत फोटोशूट केले. पण यातही जॅकचा चेहरा तिने दिसू दिला नाही. यावेळी मात्र तसे नाहीयं. होय, लीजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती आणि जॅक दोघेही मायलेक एकत्र खेळताना दिसताहेत. विशेष म्हणजे, व्हिडिओत जॅकचा चेहरा स्पष्ट दिसतोय. जॅक मम्मासारखाच क्यूट आहे, हे सांगायला नकोच. त्यामुळे त्याची पहिली झलक दाखवणारा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.ALSO READ : लीजा हेडनने शेअर केला ‘ब्रेस्टफीडिंग’चा फोटो! क्षणात झाला व्हायरल!! लीजा तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. प्रेग्नंसीदरम्यानही ती कायम मस्तीमूडमध्ये दिसली होती. जॅकच्या जन्मानंतरही तिच्या स्वभावात जराही बदल झालेला नाही. सध्या जॅकसोबत ती सुट्टीचा आनंद घेतेय. ‘क्वीन’ आणि ‘शौकीन’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी लीजा  गतवर्षी २९ आॅक्टोबरला  बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीजाने मुलाला जन्म दिला होता.    लीजाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. लीजा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीजाने  ‘आयशा’, ‘रास्कल’, ‘क्वीन’, ‘द शौकिन्स’, ‘संता बंता प्रायवेट लिमिटेड’, ‘हाउसफुल- ३’  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.