बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन हिने फार कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. दीर्घकाळापासून कुठल्याही बॉलिवूड चित्रपटात झळकली नसली तरी ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. सध्या लिसा प्रेग्नंट आहे. लवकरच ती दुस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पण आज आम्ही तुम्हाला लिसाबद्दल नाही तर तिच्या बहीणीबद्दल सांगणार आहोत. होय, लिसाच्या बहीणीला पाहिल्यानंतर तुम्ही तिच्यावरून नजर हटवू शकणार नाही.
18 वर्षांच्या वयात मल्लिकाने मॉडेलिंगची सुरुवात केली. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि शेन वॉनसोबत पेप्सीच्या जाहिरातीत ती झळकली होती.
मल्लिकाच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. म्हणूनच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.मल्लिका मोठ्या पडद्यावर अॅक्टिव्ह नाही. पण लाईमलाईटमध्ये राहणे तिला चांगलेच जमते.फिरणे आणि पार्टी करणे तिला जाम आवडते.