Join us

तैमूर अबरामला सोडा बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींना पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:04 IST

2009 साली या अभिनेत्रीला कॅन्सर झाला होता. तो काळ तिच्यासाठी खूप कठिण होता.

लिजा रे ने 2001 मध्ये 'कसूर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय वीरप्पन आणि दोबारा या चित्रपटातही ती झळकली. पण तिचा सगळा फोकस अ‍ॅक्टिंगपेक्षा लेखनावर होता. लिजा रेला दोन जुळ्या मुली आहेत. 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. सध्या लिजा आपल्या मुलींचे बालपण एन्जॉय करते. सोशल मीडियावर लिजा मुलींचे फोटो अपोलड करत असते. 

साडी नेसलेल्या या दोन्ही चिमुलकल्या खूप गोड दिसत असून यांच्यावरून तुमचीही नजर हटणार नाही असेच हे क्युट फोटो सध्या सा-यांची पसंती मिळवत आहेत. पारंपरिक साड्यांमध्ये इवल्याशा मुलींचा हा अंदाज सा-यांची पसंती मिळवत आहेत. 

लिजाने जेसन डेहनीसह लग्न केले आहे. मुळात जेसनसह लग्न केल्यानंतर लिसाचे आयुष्य सुरळीत सुरू झाले असं लिसाला वाटतं. 2009 साली लिजाला कॅन्सर झाला होता. तो काळ लिसासाठी खूप कठिण होता. त्याकाळात जेसननेच लिजाला खपू धीर दिला आणि त्यामुळे आज लिजा या आजारावर मात करू शकली. खरंतर लिजा आणि जेसन दोघांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे.

वयाच्या चाळीशीत या दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे लिजा आणि जेसन जॉर्जियाला शिफ्ट झाले. सरोगसीच्या माध्यमातून लिजाने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आणि आज लिजा आपले मुलींचे बालपण एन्जॉय करत आहे.

टॅग्स :लिजा रे