वेगवेगळ्या रिॲलिटी शोजकडे प्रेक्षक त्यांच्या वेगळेपणामुळे आकर्षित होतात. वेगवेगळ्या रिॲलिटी शोजमध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्ट बघायला मिळतात. पण यातही काही मोजकेच रिॲलिटी शो असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप पाडतात. त्याच रिॲलिटी शोजच्या पुढील सीझनची वाट पाहिली जाते. सध्याचा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि उत्सुकता वाढवणारा एक रिॲलिटी शो म्हणजे 'लॉक अप' (Lock Upp). हा शो MX Player आणि ALTBalaji या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक बघू शकतात. या शोमध्ये स्पर्धक त्यांचे डार्क सीक्रेट्स एलिमिनेशन राऊंडवेळी सांगतात आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देतात. अशाच वेगवेगळ्या टास्कमधून या शोमधील कैद्यांच्या जीवनातील गोष्टी समोर येतात.
Lock Upp मध्ये मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील कलाकारांना एकत्र आणलं आहे. या कलाकारांनी त्यांच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. वादग्रस्त सेलिब्रिटी हा सामान्यपणे सगळ्याच रिॲलिटी शोजचा यूएसपी असतो. तेच यातही आहे. हा शो बॉलिवूड क्वीन कंगना रणौत होस्ट करते. सुरुवात झाली तेव्हा या शोमध्ये १६ स्पर्धक कैदी म्हणून होते. आता त्यातील केवळ ९ शिल्लक राहिले आहेत.
या सर्वच कलाकारांनी त्यांचे सीक्रेट्स सांगितले आणि ते ऐकून प्रेक्षकही शॉक्ड झालेत. एलिमिनेशन राऊंडमध्ये करणवीर बोहराने सांगितलं होतं की, तो कर्जबाजारी आहे आणि त्याच्या जागी दुसरा कुणी असता तर त्याने आत्महत्या केली असती. पायल रोहतगीने सांगितलं होतं की, करिअरमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी ती काळ्या जादूचा वापर करायची. तर सोशल मीडिया सेन्सेशन अंजली अरोराने सांगितलं होतं की, एकदा तिला पैसे हवे होते म्हणून ती हॉटेलमधील रशियन रिसेप्शनिस्टसोबत नाइट आउटला गेली होती. तसेच अजमा फल्लाहने खुलासा केला होता की, तिने परिवाराला पैसे हवे होते म्हणून अनेक लोकांची ऑनलाइन फसवणूक केली होती. या शोची निर्मितीच अशी करण्यात आली आहे की, प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करतो, त्यांना खिळवून ठेवतो.
स्टॅंड-अप कॉमेडियन मुन्नवर फारूकी याने शोदरम्यान एक ब्लर केलेला फोटो दाखवला होता. ज्यात एक महिला बाळासोबत दिसते. पण त्याबाबत त्याने बोलण्यास नकार दिला. कारण कोर्टात यााबाबत सुनावणी सुरू आहे. तसेच तो त्याची आई गेल्यानंतर कशाप्रकारे खचला होता हे सांगताना त्याला रडू कोसळलं होतं. सर्वात जास्त चर्चा झाली ती, मंदाना करिमीच्या सीक्रेटची. तिने सांगितलं होतं की, ठरवून केलेल्या गर्भधारणेनंतरही तिला गर्भपात करावा लागला होता. त्यावेळी ती एका मोठ्या दिग्दर्शकासोबत सीक्रेट रिलेशनशिपमध्ये होती. शोमध्ये या कैद्यांचे - म्हणजेच स्पर्धकांचे असेच सीक्रेट सांगण्यात आलेत जे आतापर्यंत कुणालाही माहीत नव्हते. त्यामुळे त्यांची चर्चा जास्त झाली.
वादग्रस्त स्पर्धकांचे वादग्रस्त सीक्रेट हे प्रेक्षकांना खूप आवडले आणि शोची ही कॉन्सेप्टही लोकांना आवडली. हे यावरून दिसतं की, या शोने कमीत कमी वेळेत २०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. MX Players वर तर हा शो कमाल हिट ठरला. आता हा शो फिनालेच्या जवळ जात आहे. अशात पुढे काय काय सीक्रेट, नवे वाद बघायला मिळणार याची उत्सुकता अर्थातच प्रेक्षकांमध्ये आहे. सोबतच 'लॉक अप' या शोचा पुढील सीझन येणार का? याची उत्सुकता त्यांच्यात बघायला मिळत आहे. आता ते तर येत्या काही दिवसात समजेलच. सध्या फिनाले जवळ येत असल्याने स्पर्धकांपैकी कोण विनर ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
MX Player आणि ALTBalaji वर या शोचं लाइव्ह स्ट्रिमिंग तुम्ही २४ तास बघू शकता. इतकंच नाही तर थेट स्पर्धकांसोबत तुम्ही इंटरॅक्टही करू शकता. 'लॉक अप' या शोचं लाइव्ह स्ट्रिमिंग दोन्ही प्लॅटफॉर्मवर गेल्या २७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळातच या रिॲलिटी शोने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.