Join us

Lock Upp मध्ये निशा रावलने सांगितलं सीक्रेट, विवाहित असूनही दुसऱ्या पुरूषाला केलं होतं किस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 5:11 PM

Nisha Rawal : निशाने सांगितलं की, करण मेहरासोबत विवाहित असताना सुद्धा तिने एका परपुरूषाला किस केलं होतं. निशाने सांगितलं की, हे तिच्या मिसकॅरेजनंतर एका वर्षाने झालं होतं.

एकता कपूरचा रिअॅलिटी शो 'लॉक अप' (Lock Upp) सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत. त्यांचे सीक्रेट्स समोर येत असतात. गेल्यावर्षी पती करण मेहरासोबत झालेल्या भांडणावरून चर्चेत आलेली निशा रावलही(Nisha Rawal)  कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) या शोमध्ये आली आहे. यात तिने नुकताच खुलासा केला ज्यामुळे सगळेच हैराण झाले. निशाने सांगितलं की, करण मेहरासोबत विवाहित असताना सुद्धा तिने एका परपुरूषाला किस केलं होतं. निशाने सांगितलं की, हे तिच्या मिसकॅरेजनंतर एका वर्षाने झालं होतं.

निशा रावलने तिचं हे सीक्रेट तेव्हा सांगितलं जेव्हा बजर हिट केल्यानंतर कंगनाने तिला तिचं सीक्रेट विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की ही घटना २०१५ मधील आहे. तेव्हा मिसकॅरेजच्या वेदनेतून जात होती. यादरम्यान तिने एका पुरूषाला किस केलं होतं. ज्याने तिला या काळात आधार दिला होता. दुसरीकडे निशाने करण मेहरावर आरोप केला होता की, त्याने तिला दगा दिला. 

निशाने सांगितलं की, मिसकॅरेजनंतर ती एका दुसऱ्या पुरूषाकडे आकर्षित झाली होती. म्हणाली की, 'करणसोबत माझं लग्न २०१२ मध्ये झालं होतं. २०१४ मध्ये माझं मिसकॅरेज झालं. मी याबाबत आधीही सांगितलं आहे. जेव्हा माजं मिसकॅरेज झालं तेव्हा मी ५ महिन्यांची प्रेग्नेंट होते. अनेक लोकांना माहीत आहे की, मी फिजिकली आणि मेंटली अब्यूज नात्यात होते. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. मेंदूत आणि शरीरात खूप काही होत होतं'.

तिने पुढे सांगितलं की, 'माझ्या आय़ुष्यात अनेक वाईट घटना घडत होत्या. पण मी हे कुणाला सांगू शकत नव्हतो. पब्लिक फिगर असल्याने हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. २०१५ मध्ये माझ्या चुलत बहिणीच्या संगीत सेरमनीमध्ये माझ्यासोबत खूप काही झालं. तेव्हा मी थेरपी घेण्याचा विचार केला. तेव्हाच माझी भेट एका जुन्या मित्रासोबत झाली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यासोबत घडलेल्या घटना त्याला सांगितल्या. जेव्हा मी त्याला भेटत होते तेव्हा माझ्या पतीला माहीत असायचं. तरीही मी त्याच्याकडे आकर्षित झाले. एक वेळ अशीही आली की, मी त्याला किस केलं आणि ही बाब मी माझ्या पतीलाही सांगितली होती'.

दरम्यान एकता कपूरने आश्वासन दिलं होतं की, तिच्या शोमध्ये प्रेक्षकांना खूप कॉन्ट्रोवर्सी बघायला मिळेल आणि ती तिचं आश्वासन पूर्ण करताना दिसत आहे. याआधी तहसीन पूनावालाने एक सीक्रेट सांगितलं होतं आणि शिवम शर्माने हैराण करणारा खुलासा केला होता.  

टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडसेलिब्रिटी