Join us

Lock Upp मधील स्पर्धक पायल रोहतगी बनणार नवरी, १२ वर्षांपासून या रेसलरला करत आहे डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 18:56 IST

Payal Rohatgi : व्हिडीओत बघू शकता की, संग्राम सिंह सर्वांसमोर पायलला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो की, लॉकअपमधील अर्धे स्पर्धक मुलीकडून येतील आणि अर्धे मुलाकडून येतील.

Lock Upp: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचाचा रिअॅलिटी शो 'लॉक अप' (Lock Upp) सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणारा हा शो स्पर्धकांच्या सीक्रेट्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या शोचा आगामी एक एपिसोड फारच रोमॅंटिक होणार आहे. कारण या शोमधील स्पर्धक पायल रोहतगीला भेटण्यासाठी तिचा बॉयफ्रेन्ड संग्राम सिंह येणार आहे. इतकंच नाही तर तो पायलला लग्नासाठी प्रपोज करतानाही दिसत आहे.

व्हिडीओत बघू शकता की, संग्राम सिंह सर्वांसमोर पायलला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो की, लॉकअपमधील अर्धे स्पर्धक मुलीकडून येतील आणि अर्धे मुलाकडून येतील. संग्राम म्हणतो की, हा शो आता संपवा. मग आम्ही लग्न करू. यावर पायल त्याला विचारते आर यू श्योर? त्यावर संग्राम डोकं हलवून होकार देतो.

यानंतर संग्राम म्हणतो की, इतकी धाकड, इतकी स्ट्रॉंग, इतकी इंडीपेडेंट आणि इतकी मजबूत मुलगी मला सोडायची नाहीये. मला तिच्यासोबत आयुष्यभर लॉक इन व्हायचं आहे. 

दरम्यान पायल रोहतगी आणि संग्रामची भे रिअॅलिटी शो 'सर्वाइवर इंडिया'मध्ये झाली होती. पायल रोहतगी आणि संग्राम गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पायल लॉकअप शोमध्ये नेहमीच संग्रामबाबत बोलत असते. पायल कॅमेरासमोर अनेकदा म्हणाली की, तिचं संग्रामवर प्रेम आहे आणि त्याच्यासोबतच लग्न करणार. 

टॅग्स :पायल रोहतगीलॉक अप