आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मानसन्मान आणि प्रचंड कौतुक मिळवणाऱ्या विद्या बालनने आजवर प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांची कधीच निराशा केली नाही. सध्या त्या आयुष्यातील एक नवा अध्याय म्हणजेच आरजे होण्याचा आनंद घेते आहे. सध्या ती ‘मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन’ या 92.7 बिग एफएमवरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत असल्यामुळे विद्याने अभिनेत्री रेणूका शहाणेचे मत जाणून घेतले.
मतदानाच्या महत्त्वाबद्दल विचारल्यावर रेणूका शहाणे म्हणाली, "एखाद्या मतदाराला कदाचित असे वाटू शकते की एका मताने काहीच फरक पडणार नाही, पण असेही होते की उमेदवार एका मताने विजयी किंवा पराभूत होतो. मतदानामुळे नागरिकांना त्यांच्या आवडीचे सरकार निवडण्याचा अधिकारच मिळत नाही तर आपल्यासारख्या लोकशाही देशात आपले मत व्यक्त करण्याची संधीही मतदाराला मतदानाच्या माध्यमातून मिळत असते. आपल्या देशाने दिलेले अधिकार आपण बिनधास्तपणे वापरतो पण आपली कर्तव्य पार पाडताना पळपुटेपणा करतो."
‘मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन’ कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ ते ९ प्रक्षेपित होतो. शनिवारी व रविवारी त्याचे पुन:प्रक्षेपण केले जाते. त्याचबरोबर एक विशेष महत्त्वाचा कार्यक्रम – ‘मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन’ सोमवार ते शुक्रवार दुपारी १ ते २ या वेळेत प्रक्षेपित होतो.