भारतातील यंदाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे आणि भाजप पक्ष आघाडीवर आहे. जसजसा निवडणुकीचा रिझल्ट समोर येत आहे तसे राजकीय जगतासोबतच बॉलिवूडमधील प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. बॉलिवूड व दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज कर्नाटकातील बेंगळुरू मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. प्रकाश राज यांना जवळपास १३ हजार मते मिळाली असून या मतदारसंघातून काँग्रेसचे रिझवान अर्शद आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी ट्विट केले की, माझ्यासाठी ही चांगलीच चपराक आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माझ्यासाठी ही चांगलीच चपराक आहे. जितका अपमान, ट्रोलिंग आणि अपशब्द माझ्या वाट्याला येतील. मी तितकाच धर्म निरपेक्ष भारतासाठीचा माझा लढा सुरू ठेवेन. पुढील कठीण प्रवासाला आता फक्त सुरुवात झाली आहे. या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्यांचे खूप खूप आभार. जय हिंद.
प्रकाश राज यांच्या या ट्विटरवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. बरेचसे लोक त्यांच्या ट्विटचे कौतूक करत आहेत. तर काही लोक ट्रोल करत आहेत. लोक त्यांना सांत्वना देत लिहित आहे की ही तर सुरूवात आहे. तुम्ही तुमची लढाई कायम ठेवा. तर काहीनी म्हटले की, या देशाला तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे. तुम्ही हिंमत हरू नका. बरेचसे युजर्स त्यांना ट्रोल करत आहे. ट्रोल करणारे लिहित आहेत की तुमच्याजवळ वेळ आहे. तुम्ही मोदींचा द्वेष करणे सोडा. तर काहींनी म्हटले, डुबून मरा.