Join us

धर्मेंद्र अन् इशा देओलचा हेमा मालिनींसाठी प्रचार, 'ड्रीमगर्ल'साठी सुनील शेट्टीनेही दिला खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 5:15 PM

मथुरेत भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना लोकसभेची उमदेवारी मिळाली आहे.

Hema Malini : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे.  शिवाय उत्तरप्रदेशातील मथुरेचा देखील यात समावेश आहे. श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना लोकसभेची उमदेवारी मिळाली आहे.  २०१४ तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आता बॉलिवूडची 'ड्रिम गर्ल' लोकसभा निवडणुकीत पुन्हा हॅट्रिक मारणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. त्यासाठी अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. तसेच अभिनेत्री ईशा देओलने प्रचार करत वडील धर्मेंद्र तसेच सुनील शेट्टीचा मेसेज शेअर केलाय. 

हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र पुढे सरसावले-

या मेसेजमध्ये धर्मेंद्र म्हणाले, ''तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुमच्यासोबत का बोलतोय, आपल्या हेमासाठी. हेमा तिसऱ्यांदा मथुरेतून निवडणूक लढण्यासाठी उभी राहिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सुद्धा होतो. हेमाचं त्या नगरीवर तिथल्या मातीवर प्रचंड प्रेम आहे. या नगरीला आणखी सुंदर बनवण्याची तिची इच्छा आहे.'' असं ते म्हणाले.

सुनील शेट्टीने घेतला पुढकार-

बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीने देखील हेमा मालिनी यांना मतदान करण्यासाठी देशातील तरुणवर्गाला आवाहन केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टोरी शेअर करत सुनील शेट्टीने चाहत्यांना हा मेसेज  दिला आहे. त्यामध्ये सुनील शेट्टी म्हणतो, ''आज मी भारतातील प्रत्येक नागरिकासाठी तसेच तरुणांसाठी एक संदेश देऊ इच्छितो. संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे आपली सर्वाची जबाबदारी आहे की, आपण मतदान केलं पाहिजे. मतदान केवळ आपला अधिकार नाही तर आपली जबाबदारी आहे. सध्या ही जबाबदारी मथुरेतील नागरिकांवर आहे. '' 

ईशा देओलही करतेय प्रचार- 

अभिनेत्री ईशा देओलने आपल्या आईसाठी प्रचाराची मोहिम हाती घेतली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ईशाने लोकांना मतदान करण्यास सांगितलं आहे. 

व्हिडिओमध्ये ईशा म्हणते, '' माझ्या आईला म्हणजेच हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा विजयी करा. मी मनापासून सांगते ती तुमच्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतेय, आणि यापुढेही करत राहिल , तम्हाला ते माहिती आहे आणि तुम्ही ते पाहाताय सुद्धा.''  आपल्या आईविषयी मुखोद्गार काढून व्हिडिओ शेअर करत ईशाने नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्रसुनील शेट्टीलोकसभा निवडणूक २०२४