करोना काळात अनेकांचा देवदूत ठरलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद (sonu sood). पडद्यावर सोनू सूदने अनेकदा नकारात्मक भूमिका केल्या. परंतु, खऱ्या आयुष्यात तो अनेकांसाठी हिरो झाला. अगदी लोकांना त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यापासून ते त्यांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत सोनू सूदने अनेकांना मदत केली. इतकंच नाही तर त्याची ही मदत आजही सुरु आहे. त्यांच्या याच मदतकार्याची दखल 'लोकमत'ने घेतली आहे. नुकतंच सोनू सूदला Most stylish Humanitarian या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
आज (१२ सप्टेंबर) लोकमत मोस्ट स्टालिश २०२३ हा पुरस्कार सोहळा रंगत आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज, मान्यवर कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यात सोनू सूदने केलेल्या कामाची दखल घेत लोकमतने त्याला Most stylish Humanitarian हा पुरस्कार देत त्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, करोना काळात सोनू सूदने सुरु केलेला मदतीचा ओघ अजूनही कायम आहे. आजही तो अनेक गरजूंना आर्थिक मदत करुन सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. यात तो गरजू मुलांच्या शिक्षणासाठी, काहींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वा वैद्यकीय उपचारांसाठी अशा विविध गोष्टींसाठी मदत करत आहे.