या चित्रपटामध्ये अभिनेत्री रसिका दुग्गल नवाजसोबत स्क्रीन शेअर करणार असून, ती मंटो यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये १९४० चा काळ साकारण्यात येणार आहे. सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांच्या सर्व कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्रय, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरणाºया आहेत. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना भारताच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतर फुटकळ साहित्य लिहिले. ह्यअगर आपको मेरी कहानियां काबिल ए बर्दाश्त नहीं लगती है, तो वा इसलिए क्योंकि ये वक्त, ये दौर ही काबिल ए बर्दाश्त नहीं है, असे मंटो नेहमी म्हणायचे. मंटो यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील समराला इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर इथे झाले.“If you cannot bear these stories, it is because we live in unbearable times” - #Manto#Cannes2017#Cannes70 #Film#Moviespic.twitter.com/AO0EYLOxPK— Manto (@MantoSpeaks) 22 May 2017
पाहा,‘मंटो’मधील नवाजचा नवा लूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 9:57 AM
पाकिस्तानी पटकथा लेखक सआदत हसन मंटोवर एक चित्रपट बनवणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून होती. चर्चा सत्यात उतरली आणि चित्रपटाचा ...
पाकिस्तानी पटकथा लेखक सआदत हसन मंटोवर एक चित्रपट बनवणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून होती. चर्चा सत्यात उतरली आणि चित्रपटाचा नवा लूक जारी करण्यात आला. ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या बहुचर्चित चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मंटोची भूमिका साकारतो आहे. ‘मंटो’च्या नव्या पोस्टरमध्ये नवाजच्या चेहºयावरचे भाव आणि पोस्टरवरची उर्दू कॅलिग्राफी अतिशय वास्तवदर्शी भासत आहे. नेहमीच्या लिखाणाच्या जीर्ण वहीतील पानाप्रमाणे असलेल्या पोस्टरवर एक ओरखडाही आहे. या पोस्टरसोबत लिहिण्यात आलेल्या ओळीही अप्रतिम आहेत.